जाणून घ्या मध्यरात्री लघवी होण्याची कारणं

तुम्ही मध्यरात्री लघवी करण्यासाठी वारंवार उठता का?  पण तुम्ही का उठता याची कारणं तुम्हाला माहित आहेत का?

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे

झोपण्याअगोदर जास्त पाणी पायल्याने तुम्हाला मध्यरात्री ही समस्या जाणवू शकते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लोकांना झोपण्याअगोदर किती पाणी प्यावं याची कल्पना नसते. त्यामुळे काहीवेळा जास्त पाणी प्यायल्याने लोकं मध्यरात्री लघवीसाठी उठतात. शक्यतो झोपण्यापूर्वी दोन तास आधी पाणी पिऊ नये.

झोपण्याच्यावेळी दारू किंवा कॅफेनचं सेवन

दारू किंवा कॅफनेच्या अतिरिक्त सेवनाने जास्त वेळा लघवी होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, संध्याकाळी ६ च्या अगोदर चहा किंवा कॉफीचे सेवन करावे. तसेच झोपण्यापूर्वीचे ३ तास तरी दारू पिऊ नये.

अँटिडायुरेटीक हार्मोनची कमी

जर तुमच्या शरीरात अँटिडायुरेटीक हार्मोनची कमी असेल तर तुम्हाला ही समस्या सतावू शकते. या हार्मोनमुळे किडनीला द्रव पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे या हार्मोनची कमतरता निर्माण झाल्यास जास्त वेळा लघवीची समस्या उद्भवू शकते.

मधुमेही रूग्ण

मधुमेही रूग्णांना हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. कारण रक्तातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी शरीरात मूत्र तयार होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे जास्त प्रमाणात लघवी होऊ शकते.

लैंगिक संक्रमित आजार (sexually transmitted diseases)

काही लैंगिक प्रकारच्या आजारांमुळे वारवांर लघवी होण्याची शक्यता असते. जसं की, गॉनोऱ्हिआ किंवा क्लॅमिडिया.

गर्भाशय किंवा अंडाशयाच्या आकारात वाढ

अनेकवेळा गर्भाशय किंवा अंडाशयाच्या काही समस्येमुळे या अवयवांचा आकार वाढतो. या अवयवांचा आकार वाढल्याने मूत्राशयावर दाब येतो आणि तुम्हाला सातत्याने लघवीला जावंस वाटतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter