तरूण वयात हार्ट अटॅक येण्याचं कारण…

जवळपास ५००० तरुणांच्या प्रकृतीचा १५ वर्ष अभ्यास करण्यात आला. त्यामधून हे तथ्य पुढे आलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

सध्या हृदयासबंधीच्या आजारांमुळे अनेक मृत्यू होताना पाहायला मिळतात. या मृत्यूंमध्ये तरूण मुलांचं प्रमाण जास्त आहे. यासाठीच ‘कोरोनरी आर्टरी रिस्क डेव्हलपमेंट’ यांच्याकडून एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाच्या माध्यमातून तरूण मुलं हृदयाच्या आजारांमुळे का बळी पडत आहेत, याची तपासणी करण्यात आली.

१८ ते ३० वयोगटातील ५००० तरूणांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. जवळपास १५ वर्षे या तरुणांचा अभ्यास करण्यात आला.

या अभ्यासाच्या माध्यामातून असं लक्षात आलंय कीजी तरूण मुलं दररोज १० सिगारेट ओढतात त्यांना हृदयाचा आजार होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढते. त्यासोबतचं कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोकाही ५० टक्क्यांनी बळावतो आणि रक्तदाब बळावण्याची शक्यताही ३० टक्क्यांनी वाढते.  

तरूण वयातील मुलांमध्ये हृदयरोग वाढण्याची कारणं

  • धुम्रपान
  • ताण-तणाव
  • चुकीचा आहार
  • शारीरिक हालचालीचा अभाव
  • अतिप्रमात मीठाचं सेवन
  • हवाबंद पाकिटातील पदार्थ खाणं

या समस्येला दूर ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना निरोगी आहार देणं गरजेचं आहे. त्यासोबतच तरूणांनी दररोज एक्ससाईज करणं गरजेचं आहेरक्तदाब नियंत्रणात ठेवला पाहिजेमीठाचं सेवनही प्रमाणातच केलं पाहिजे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना धुम्रपान केल्याने निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी समजवलं पाहिजे.

बैठी जीवनशैली देखील या समस्येला कारणीभूत ठरू शकते. तसचं आजकालची मुलं मानसिक दृष्ट्या देखील फार तणावात असतात. यासाठी जीवनशैलीतील बदल करणे गरजेचे आहे. जेणेकरून हृदयासंबंधीचे आजार होण्यास प्रतिबंध करता येईल.

तरूणांनी एक्सरसाइजयोगाशारीरिक हालचाल करावी. त्यासोबतच मानसिक दृष्ट्या देखील निरोगी रहावं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter