तरूणांमध्ये का वाढतायत लैंगिक समस्या?

मानसिक आजारांमुळे होणारं 'इरेक्टाइल डिसफंक्शन' हा लैंगिक मानसिक आजार सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सततचा ताण-तणाव आणि चिडचिडेपणा यामुळे पुरूषांमध्ये हा आजार दिसू शकतो. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतोय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मानसिक आजारांमुळे होणारं ‘इरेक्टाइल डिसफंक्शन’ हा एक लैंगिक मानसिक आजार आहे. हा मानसिक आजार लैंगिक संबंधांविषयी असून पुरूषांमध्ये पाहायला मिळतो. सततचा ताण-तणाव आणि चिडचिडेपणा यामुळे पुरूषांमध्ये हा आजार दिसू शकतो. याच समस्येने त्रस्त असलेलं एक जोडपं डॉ. दिपक जुमानी यांच्याकडे आलं.

याविषयी सेक्युयल हेल्थ फिजीशियन डॉ. जुमानी यांच्या सांगण्यानुसार, एक महिला तिच्या पतीला घेऊन माझ्याकडे आली होती. इरेक्टाइल डिसफंक्शन यामुळे ती त्याला सोडून जाईल असं तिचं म्हणणं होतं. या महिलेचा नवरा माझ्यासोबत नजर मिळवत नव्हता. मात्र त्याच्या चेहऱ्यावर खूप चिंतेचे भाव दिसत होते.

तपासणीतून असं लक्षात आलं की, या व्यक्तीला झालेल्या इरेक्टाइल डिसफंक्शन आजाराचा संबंध हा सततची चिंता आणि चिडचिडेपणा याच्याशी आहे. डॉ. जुमानी यांच्या मतानुसार, २५-३० वयोगटातील तरूण मुलं देखील सध्या ही तक्रार घेऊन येतात.

डॉ. जुमानी पुढे म्हणाले की, “या प्रकरणामध्ये मला या व्यक्तीच्या पत्नीचं देखील समुपदेशन करायचं होतं. सध्या सायकोजेनिक इरेक्टाइल डिसफंक्शन या आजाराला तरूण मुलं जास्त बळी पडताना दिसतायतं. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की खऱ्या आय़ुष्यातील लैंगिक संबंध हे फार वेगळे असतात.”

या आजाराविषयी शहरातील इतर डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्वाला अति प्रमाणात पॉनोग्राफी कारणीभूत आहे.

माईंट टेंपलच्या संस्थापक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंजली छाब्रिया यांच्या सांगण्यानुसार,  “इरेक्टाइल डिसफंक्शन आजार होण्यामागे तीन प्रमुख कारणण आहेत. ती म्हणजे मानसिक, मेंदू संबंधी आणि रक्तवाहिन्यांसी संबंधीत. अधिकतर लोकांमध्ये हा आजार मानसिक स्वरूपाचा पाहायला मिळतो.”

मसिना रूग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. युसुफ माचिसवाला म्हणाले की, “आमच्याकडे अशा प्रकारच्या रूग्णांवर औषधं कमी तर थेरेपीच्या आधारे उपचार करण्यात येतात. अतिप्रमाणातील पॉनोग्राफी ही या समस्येला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. शिवाय ही समस्या तरूण व्यक्तींमद्ये सामान्यपपणे आढळतेय.”

मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रियंका महाजन यांच्या सांगण्यानुसार, “काही वेगळ्या पद्धतींद्वारे जसं की ड्युअर सेक्स थेरेपी यामध्ये नवरा आणि बायको दोघांचं समुपदेशन केलं जातं. यामध्ये एक गोष्ट चांगली म्हणजे लोकं या समस्येला आजार समजतात आणि याच्या उपचारांसाठी आता स्वतःहून पुढाकार घेतायत.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter