#WorldDiabetesDay : मधुमेहींसाठी फायदेशीर योगासनं

मधुमेह ही केवळ भारताचीच नाही तर संपूर्ण देशाची समस्या बनलीये. २०१५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या अहवालनुसार, भारताची ८.७ टक्के लोकसंख्या मधुमेहाने ग्रस्त आहे. याचाच अर्थ भारतातील ६९.२ दशलक्ष लोकांना मधुमेहासारखा गंभीर आजार आहे. तर ३६ दशलक्ष लोकांमध्ये मधुमेहाचं निदानच होत नाही.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या संपूर्ण जगभरात वाढतेय. भारतात देखील मधुमेह झालेल्या लोकांची संख्या कमी नाही. मधुमेह या आजाराला नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, किडनी या अवयवांवर परिणाम होतात. त्यामुळे दृष्टी जाणं, किडनी निकामी होणं, हृदयाचा झटका, स्ट्रोक या समस्या उद्भवू शकतात.

एखाद्या व्यक्तीला एकदा का मधुमेह झाला की तो बरा होऊ शकत नाही. मात्र त्यावर नियंत्रण करता येणं शक्य आहे. मधुमेहाला नियंत्रणात आणण्यासाठी योगासन खूप फायदेशीर ठरतात. आपल्या भारतातही अनेक इंस्टिट्युटमध्ये मधुमेहावर योगाद्वारे कंस नियंत्रण मिळवता येतं यांंचं प्रशिक्षण दिलं जातं.

मुंबईतील आर.ए पोदार वैद्यकीय महाविद्यालयातील रिसर्च स्कॉलर एम.डीच्या डॉ. संगिता पटेल म्हणाल्या की, “मधुमेह हा आजार फार झपाट्याने जगभरात पसरतोय. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेने देखील भारतातील मधुमेहाचं प्रमाण जास्त असल्याचं सांगितलंय. काही पुस्तक आणि यापूर्वी झालेल्या अभ्यासांच्या माध्यामातून विशिष्ट आजारांच्या उपचारांसाठी योगा फायदेशीर ठरू शकतो. काही गोष्टी सोडल्या तर योगाचा वापर आपण थेरेपीसाठी तसंच उपचारांसाठी वापरू शकतो.”

मधुमेहासाठी फायदेशीर योगासनं

2-1-300x149

पश्चिमोत्तानासन

हे आसन केल्यानंतर पाठ, मांडीचे स्नायू  आणि नितंब ताणले जातात. शिवाय हे आसन ओटीपोट, खांदे या अवयवांसाठी देखील फायदेशीर आहे.

Ardhamatsyendrasana-300x178

अर्धमत्स्येंद्रासन 

हे आसन पाठीच्या मणक्यासाठी फार उपयुुक्त ठरतं शिवाय यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढण्यास मदत होते.

4-300x258

वजरासन

हे आसन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्यासोबतच अन्न पचण्यास कोणताही अडथळा येत नाही. शिवाय यामुळे  पाठीचं दुखणंही कमी होण्यास मदत होते.

1-3-246x300

भस्त्रिका

यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होऊन कफचा त्रास होत नाही. याशिवाय एकाग्रता वाढण्यासाठी हे फायदेशीर आहे.

Bhramari-Pranayam-240x300

भ्रामरी

या आसनामुळे ताणतणाव आणि चिडचिडेपणा निघून जाण्यास मदत होते. जर हे आसन नियमितपणे केलं तर हे खूप  फायदेशीर आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter