सोहा अली खान करतेय गर्भवती असताना योग, जाणून घ्या महत्त्व आणि फायदे

सैफअली खानची बहिण बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान गर्भवती आहे. सध्या सोहाचे योगा करतानाचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेचं व्हायरल झालेत. फिट राहण्यासाठी अनेक जणं सध्या योगासनांवर भर देताना दिसतायत. माय मेडिकल मंत्राने योगा प्रशिक्षकांकडून गर्भवती असताना कोणती आसनं करायची आणि याचा फायदा काय हे जाणून घेतलं.

0
1495
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

योगासनांचा फायदा गर्भवती महिलांना नक्की होतो. मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी योगासनं फायदेशीर असतात. शरीरातील उर्जा नियंत्रित करण्यासाठी आणि प्रसूतीच्या वेळी देखील योगसनांचा फायदा होतो.

19228419_317794648660822_2656393850456637440_n

गर्भवती असताना करावयाची योगासनं

  • वज्रासन
  • उत्कटासन
  • कोनासन
  • अनुलोम-विलोम
  • सेतू-बंधासन

माय मेडिकल मंत्राशी बोलताना योगा शिक्षक हानिशा जटवानी म्हणतात, “तुम्ही किती महिन्याच्या गर्भवती आहात त्याप्रमाणे योगासनं करावीत. ० ते ४ महिने गर्भवती महिलांसाठी वेगळी आसनं आहेत आणि ४ महिन्यांच्यावर गर्भवती असणाऱ्यांसाठी वेगळी आसनं आहेत. योगासनांच्या माध्यमातून आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. मी गर्भवती असताना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत योगासनं केली.”

महिलांनी योगासनं करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  • कपालभाती करू नये
  • पोटावर प्रेशर अजिबात देऊ नका
  • प्राणायाम करावा, साधे स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत
  • घाम येऊ देता कामा नये

पुण्यातील योगा प्रशिक्षक रचना साठे म्हणतात, “गर्भवती महिलांनी पोटावर अजिबात जोर देऊ नये. श्वास जास्तवेळ धरून ठेऊ नये. शीर्षासन येत असेल तरचं करावं, नाहीतर गर्भावस्थेत शीर्षासन शिकू नये. या सोप्प्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर महिलांना गर्भवती असताना योगासनांचा चांगलाच फायदा होतो.”

19379375_280927695715961_5710883512295358464_n

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter