‘योग’ केल्याने वाढेल शुक्राणूंची गुणवत्ता

योग केल्याने फक्त शरीर आणि मन स्वस्थ राहत नाही. तर एकाग्रता वाढण्यासही मदत होते. 'योग'चा आणखी एक फायदा म्हणजे शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी योग उपयुक्त आहे. दिल्लीच्या ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) संशोधनात ही गोष्ट समोर आलीये

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • दिल्लीच्या ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) डॉक्टरांनी हे संशोधन केलं
  • संशोधकांच्या मते रोज योग केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता वाढते
  • एम्सच्या डॉक्टरांचं हे संशोधन नेचर रिव्हू युरॉलॉजी या जर्नलमध्ये छापण्यात आलंय

संशोधकांच्या मते ‘डीएनए’ला नुकसान झाल्याने याचा शेट परिणाम शुक्राणूंच्या गुणवत्तेवर होतो. “शुक्राणूंची गुणवत्ता ही सुदृढ मूल जन्माला येण्यासाठी फार महत्त्वाची असते,” असं एम्स रुग्णालयाच्या जेनेटिक्स विभागाच्या प्राध्यापक डॉ. रिमा दादा सांगतात.

डॉ. रिमा दादा यांच्या माहितीनुसार, “शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान झालं, तर पुरुषांमध्ये वंध्यत्व येतं किंवा जन्माला येणाऱ्या मुलामध्ये जन्मत:च काही दोष राहतात. शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान झाल्यास जन्माला येणाऱ्या मुलात काही आनुवंशिक दोष राहण्याची शक्यता असते.”

ऑक्सिडेटिव्ह स्टेसमुळे शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान होण्याची शक्यता असते. पुरुषांच्या शरीरातील ‘मेल जर्म’ पेशी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससाठी कारणीभूत असतात.

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची कारणं, 

पर्यावरणातील प्रदूषण, शरीराला अपाय करणाऱ्या केमिकल्सशी सतत येणारा संबंध, इंन्फेक्शन, सिगारेट आणि दारूचं व्यसन, लठ्ठपणा आणि पौष्टीक घटकांचा अभाव असणारं अन्न.

या सर्व गोष्टींवर आपण मात करू शकतो. फक्त आपल्या जीवनशैलीत काही बदल करण्याची गरज आहे. जीवनशैलीतील बदलामुळे पुरुषांमध्ये येणारं वंध्यत्व आपण दूर करू शकतो. डॉ. रिमा म्हणतात, “दररोज योग केल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. शुक्राणूंच्या डीएनएला होणारं नुकसानही कमी होतं.”

डॉक्टरांनी हे संशोधन रोज योग करणाऱ्या २०० पुरुषांवर केलं होतं. डॉ. रिमा पुढे म्हणतात, “रोज योग केल्याने २१ दिवसांच्या आत पुरुषांमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झालेला निदर्शनास आला. तर, सहा महिन्यात शुक्राणूंना झालेलं नुकसान कमी झाल्याचं संशोधनात समोर आलं. योग केल्याने डिप्रेशन, स्ट्रेस आणि चिडचिडेपणा कमी झाला होता.”

योग केल्याने पुरुषांच्या शरीरात तयार होणाऱ्या शुक्राणूंना नुकसान होत नाही. त्याचबरोबर शरीराची वृद्ध होण्याची प्रक्रिया कमी होते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)