‘या’ पदार्थांमुळे दातांचं आरोग्य धोक्यात

दातांचं आरोग्य सुधारण्यासाठी खाद्यपदार्थांकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. अमेरिकन डेंटिस्ट असोसिएशनचे मॅथ्यू मेसिना यांनी दातांच्या आरोग्यासाठी अपायकारक असणाऱ्या पदार्थांबद्दल माहिती दिलीये.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बाकी कोणतंही दुखणं परवडेल मात्र दातांचं दुखणं नको…असं आपण बऱ्याचदा म्हणतो. दातांचं आरोग्य सुधारावं तसंच दात किडू नये यासाठी दोन वेळा दात घासणं, चूळ भरणं या सर्व गोष्टी आपण करतो. मात्र दातांच्या आरोग्यासाठी खाण्याच्या सवयींकडे आपण हमखास दुर्लक्ष करतो. आपण खात असलेले काही पदार्थ दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

कॅन्डी सारख्या पदार्थांनी दातांचं हमखास नुकसान होतं, असं अमेरिकन डेंटिस्ट असोसिएशनचे मॅथ्यू मेसिना यांनी सांगितलं. त्यांच्या सांगण्यानुसार, खाली दिलेल्या काही पदार्थांमुळे दातांचं आरोग्य बिघडतं.

चिकट कॅन्डी

या प्रकारच्या कॅन्डीमुळे दातांचं फार नुकसान होतं. जसं की, कॅरिमल, फ्रुटज्युस कॅन्डी. या कॅन्डी चिकट असल्यामुळे अधिक काळ चावाव्या लागतात. परिणामी त्या दातांना बराच वेळ चिकटून राहतात. यामुळे तोंडात जंतू निर्माण होऊन दातांचं आरोग्य बिघडतं.

मॅथ्यू मेसिना यांच्या सांगण्यानुसार, जंतूमुळे दातांच्या सुरक्षेसाठी असलेला दातांवरील स्तर निघून जातो. यामुळे दात किडतात.

कडक कॅन्डी  

बाजारात मिळणाऱ्या कडक कॅन्डी या खातेवेळी चावता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कॅन्डी तोंडात बराच वेळ राहतात. या कॅन्डी गोड असल्याने तोंडातील जंतूची संख्या देखील वाढते. आणि याचा परिणाम दातांच्या आरोग्यावर होतो.

लोणचं  

लोणचं आंबट असल्याने त्यामध्ये अॅसिडची मात्रा असते. २००४ मध्ये केलेल्या संशोधनानुसार असं समजलं होतं की, लोणचं खाणं हे दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. यामध्ये अभ्यास करण्यात आलेल्या व्यक्ती ज्या दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा लोणचं खात होत्या त्यांच्या दातांवर परिणाम होण्याचा धोका ८५ टक्क्यांनी वाढला होता.

सोडा

साखरयुक्त सोड्याच्या पेयांमुळे दात खराब होतात याची प्रत्येकाला कल्पना असते. मात्र अशा पेयांमध्ये असणाऱ्या साखरेपेक्षा सोड्यामध्ये असलेल्या अॅसिडमुळे दातांना अधिक प्रमाणात धोका असतो. या सोड्यामध्ये साइट्रिक आणि फॉस्फोरिक अॅसिड असतात ज्यामुळे दातांचं नुकसान होतं.

रेड वाईन

रेड वाईन प्यायल्याने देखील दातांचं आरोग्य बिघडतं. रेड वाईनमध्ये असणाऱ्या टॅनिन या घटकामुळे रेड वाईन तोंडात सुकते आणि त्यामधील घटक दांताना चिकटतात. यामुळे दात खराब होतात

मेसिना यांच्या सांगण्यानुसार, एखाद्या कपड्यावर वाईन डाग लागतो त्याचप्रमाणे दातांवरही वाईनचा डाग राहतो.

कॉफी

कपातली कॉफी संपली की कॉफीचे डाग कपाच्या आताल्या बाजूला पहायला मिळतात. त्याचप्रमाणे कॉफी प्यायल्यानंतर त्याचे डाग डातांवरही लागतात. हे डाग बराच काळ दातांवर राहिले तर दात किडण्याची शक्यता असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter