#WorldArthritisDay- संधिवाताबाबत असणारे 5 गैरसमज

12 ऑक्टोबर हा जागतिक आर्थरायटीस दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त लोकांमध्ये आर्थरायटीसबाबत जनजागृती व्हावी यासाठी मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सचिन भोसले यांनी यासंदर्भातील गैरसमज संगितलेत.

0
820
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आर्थरायटीस ही सामान्य परिस्थिती असून अजूनही फारशा लोकांना त्याबाबत माहिती नाहीये. मुख्य म्हणजे आर्थरायटीस हा एक केवळ आजार नसून रूग्णाला यामध्ये जॉईंट पेन आणि त्यासंबंधीचे आजारही उद्भवतात.  कोणत्याही वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांना हा आजार होण्याची शक्यता असते. जागतिक आर्थरायटीस दिनाच्या निमित्ताने याबाबत जनजागृती होणं फार गरजेचं आहे. जेणेकरून या आजाराचं योग्यवेळी निदान होऊन त्यावर उपचार होऊ शकतात.

या आजाराचे लक्षणं ती म्हणजे सूज येणं, वेदना होणं, अवयव आखडणं इत्यादी. हा आजार अतिप्रमाणात वाढला तर तीव्र वेदना होणं, दररोजची कामं करता न येणं या समस्यांना सामोरं जावं लागतं. काही inflammatory आजारांमुळे डोळे, फुफ्फुसं, किडनी आणि त्वचा यांच्यावरही परिणाम होतो.

आर्थरायटीसबद्दल असणारे पाच गैरसमज

बोट मोडल्याने आर्थरायटीस होतो

अनेक लोकांमध्ये हा गैरसमज आहे की हाताची बोटं मोडल्याने आर्थरायटीस होतो. मात्र असं नाहीये, यामुळे आरोग्याला कोणताही धोका होत नाही. जर बोटं मोडल्यावर तुम्हाला वेदना होत असतील तर तुमच्या सांध्यांमध्ये समस्या असण्याची शक्यता आहे.

केवळ वयोवृद्ध लोकांना आर्थरायटीस होतो

1 ते 2 वर्षांच्या मुलांना देखील आर्थरायटीस होऊ शकतो तर 90 वर्षांच्या व्यक्तीला देखील आर्थरायटीस होण्याचा धोका असतो. याचाच अर्थ आर्थरायटीस हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

आहाराचा आर्थरायटीसवर काहीही परिणाम होत नाही

आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केला तर त्याचा चांगला परिणाम आर्थरायटीसवर दिसून येतो. मासे, ऑलिव्ह ऑईल, धान्य, फळं, भाज्या यांचा आहारात समावेश केल्याने सूज येण्याची समस्या कमी होते. परिणामी आर्थरायटीसवरही त्याचा चांगला परिणाम होतो.

प्रत्येक सांधेदुखी ही आर्थरायटीसचा भाग असते

अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे व्यक्तीला सांधेदुखीची समस्या ओढावू शकते. जसं की टेंडिनाइटिस, बुर्सिटिस इत्यादी.

आर्थरायटीस असताना शारीरिक हालचाल करू नये

नियमित व्यायामांमुळे सांध्याच्या कार्याला मदत मिळते. त्यामुळे कमी प्रमाणात का होईना अशा रूग्णांनी शारीरिक हालचाल केली पाहिजे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here