#WorldArthritisDay : तरुण वयातही का होतो संधिवात?

वयस्करांमध्ये दिसून येणारी संधिवाताची समस्या आता तरुणांमध्ये दिसू लागलीये. तरुण पिढीला Rehumatic Arthrtitis ची समस्या भेडसावतेय. जीवनशैलीतील काही बदल हे त्यामागील एक कारण आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

Arthritis ही समस्या कित्येक वर्षांपासून वयस्करांमध्ये दिसून येतेय. मात्र गेल्या काही दशकांपासून तरुणांमध्येही याचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. तरुण पिढीत Rehumatic Arthrtitis (संधिवाताचा एक प्रकार) याची समस्या भेडसावू लागलीये.

Rheumatic arthritis चा परिणाम हात, गुडघे, कोपर आणि हिप यांच्या विविध सांध्यांवर होतो. यामुळे कार्टिलेजला हानी पोहोचते आणि शारीरिक व्यंग, वेदना, शारीरिक कार्यात अडथळा अशा समस्या निर्माण होतात. तरुण पिढीमध्ये ही समस्या निर्माण होण्यास बैठी जीवनशैली, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव यांसारख्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

एका सर्वेक्षणानुसार 40 पेक्षा कमी वयाच्या प्रत्येकी 4 पैकी एका व्यक्तीला arthiritis समस्या आहे. अनेक तरुणांना विविध कारणांमुळे पूर्णपणे नी रिप्लेसमेंट करावी लागते. खेळताना होणारी दुखापत आणि अपघात ही त्यापैकी काही कारणं आहेत. ज्यामुळे कार्टिलेज किंवा सांध्यांच्या जोडणीवर परिणाम होतो. दुखापतीमुळे arthritisची समस्या वाढते. अशा वेळी इम्प्लांट किंवा रिप्लेसमेंट सर्जरीचाच पर्याय असतो.

मुंबईच्या नानावटी रुग्णालयात 26 वर्षांचा मुलगा गुडघ्याची समस्या घेऊन आला होता. त्याला त्याचा गुडघा सरळ करणं आणि आधाराशिवाय चालणं शक्य होत नव्हतं. एका बाईक अपघातामुळे त्याचा गुडघ्यात सूज आणि वेदना होऊ लागल्या. तेव्हापासून त्याला Rehumatic arthiritis समस्या होती. पूर्णपणे नी रिप्लेसमेंट करणं हा एकमेव पर्याय होता. त्याच्यावर यशस्वी अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आता तो कोणत्याही आधाराशिवाय चालू शकतो आणि इतर सर्वसामान्य हालचाली करू शकतो.

नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी विभागाचे संचालक डॉ. प्रदीप भोसले म्हणाले की, “Rheumatic Arthritis ची समस्या दूर करता येत नाही. मात्र अत्याधुनिक औषधोपचारांमुळे त्यावर नियंत्रण मिळवता येतं. कार्टिलेजला धोका पोहोचण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळवलं तर शरीराला विकृती येत नाही. मात्र एकदा का कार्टिलेजला हानी पोहोचली तर सर्जरीशिवाय त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही.”

“जॉईंट रिप्लेसमेंटसाठी भारतात जे ट्रान्सप्लांट्स वापरले जातात ते चांगल्या गुणवत्तेचे आहेत. ट्रान्सप्लांटमुळे कित्येक वर्ष अंथरुणाला खिळून बसलेल्या रुग्णाला कोणत्याही वेदनेशिवाय चालणं शक्य होतं, तो सर्वसामान्य आयुष्य जगतो.”, असंही डॉ. भोसले म्हणाले.

तरुण पिढीला जाईंट रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जात नाही. मात्र गेल्या 10 ते 15 वर्षांत जॉईंट रिप्लेंसमेंट करणाऱ्या तरुणांची संख्या वाढलीये. त्यामुळे इम्प्लांटचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिनं केंद्र सरकारनंही पावलं उचललीत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here