#WorldMentalHealthDay – कारणं ओळखा, आत्महत्या रोखा

10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. आत्महत्येला प्रतिबंध यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना रोखून, मानसिक समस्येवर वेळीच उपचार करून आत्महत्येला प्रतिबंध करता येणं शक्य आहे.

0
858
Silhouette of a boy looking depressed
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आत्महत्या ही गंभीर अशी समस्या आहे,मात्र त्या वेळीच हस्तक्षेप केल्यास त्या रोखता येऊ शकतात. आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व्यापक अशा उपाययोजनांची गरज आहे.

कोणाला धोका?

  • उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आत्महत्या आणि मनोविकार (विशेषत: डिप्रेशन, अल्कोहोल युझ डिसॉर्डर) यांचा संबंध जास्त आहे.
  • आर्थिक समस्या, नातेसंबंध तुटणे, तीव्र वेदना आणि आजार हे सर्व सहन करण्याची क्षमता संपल्यानंतर या आवेगात अनेक आत्महत्या होतात.
  • भांडण, आपत्ती, हिंसाचार, नुकसान आणि एकाकीपणाची भावना यांच्याही आत्महत्येशी संबंध आहे.
  • निर्वासित, स्थलांतरित, समलिंगी, तृतीयपंथी, कैदी यांच्यामध्येही आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे.
  • याआधी आत्महत्येचा प्रयत्न करणे हे आत्महत्येला कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा घटक आहे.

आत्महत्येच्या पद्धती

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात विष घेऊन आत्महत्या करण्याचं प्रमाण सुमारे 20 टक्के आहे. त्यापैकी बहुतेक प्रकरणं ही ग्रामीण भागात जिथे शेती केली जाते आणि कमी तसंच मध्यम उत्तपन्न असलेल्या देशांमध्ये आढळून येतात.

गळफास लावून घेणं आणि गोळ्या झाडून घेऊनही आत्महत्या केल्या जातात.

आत्महत्येला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आत्महत्येच्या पद्धती माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींवर बंधनं आणावीत.

प्रतिबंध आणि नियंत्रण

  • आत्महत्येसाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींवर बंधनं घालणे (उदा. विष, बंदूक, विशेष प्रकारची औषधं)
  • योग्य उपाययोजना करून मद्यपानाचे प्रमाण कमी करणे
  • मानसिक समस्या, तीव्र वेदना वेळीच ओळखून उपचार करणं, अशा व्यक्तींची काळजी घेणे
  • आत्महत्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची काळजी घेणे, त्यांना आधर देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे.

पुण्याच्या ससून रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत पवार म्हणाले, “आत्महत्या ही गुंतागुंतीची समस्या आहे आणि त्यामुळे आरोग्य, शिक्षण, शेती, व्यापार, न्याय, राजकारण, प्रसारमाध्यमं अशा विविध क्षेत्रांमध्ये आत्महत्येला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या उपाययोजना सर्वसमावेशक असाव्यात”

पुण्यातील मानसोपाचर तज्ज्ञ डॉ. कल्याणी पारकर यांनी सांगितलं, “मानसिक विकार आणि आत्महत्या याबाबत असलेला कलंक  यामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणारे व्यक्ती मदत मागत नाहीत, त्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. आत्महत्येबाबत जनजागृतीचा अभाव आणि याबाबत चर्चा करण्यासाठी समाजात असलेला अनेक टॅबू यामुळे आत्महत्येला रोखण्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. समाजात जनजागृती करणे आणि टॅबू दूर करणं हे देशातील आत्महत्या रोखण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter