World Hypertension Day – उच्च रक्तदाबासंदर्भात असणारे गैरसमज

रक्‍तदाब आणि त्‍यावरील उपचाराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. नेमके याबाबत कोणते गैरसमज असतात याची माहिती दिलीये मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयाचे कंसल्टंट फिजिशियन व इंटर्निस्‍ट डॉ. संजय शाह यांनी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

रक्‍तदाब आणि त्‍यावरील उपचाराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. या गैरसमजांना समजून घेऊन त्‍यांना दूर करणं अत्‍यंत महत्‍त्‍वाचं आहे. आपल्‍या आरोग्‍यासाठी या गैरसमजांबाबत बदल करणं गरजेचं आहे. रक्तदाबाविषयी असणारे 7 सामान्‍य गैरसमज आणि त्यामागील सत्य

 • गैरसमज : रक्‍तदाबाला प्रतिबंध करू शकत नाही

सत्‍य : एखाद्या व्‍यक्‍तीमध्‍ये रक्‍तदाबाची अधिक धोकादायक लक्षणं दिसून आली तरी योग्‍य प्रकारे केलेले प्रतिबंधात्मक उपचार उच्‍च रक्‍तदाब नियंत्रणात आणण्यासोबतच त्‍यावर प्रति‍बंध करण्‍यामध्‍ये मदत करू शकतात. या उपचारामध्‍ये वाढणा-या वजनावर नियंत्रण, योग्य खाण्‍याच्‍या सवयी, मीठाचं कमी सेवन, नियमित व्‍यायाम आणि कोणत्‍याही गोष्‍टीचा ताण न घेणं यांचा समावेश असतो.

 • गैरसमज : जेवताना वरून मीठ घेत नाही म्हणजे मीठ सेवनाच्‍या बाबतीत नियंत्रण आहे.

सत्‍य : आपण सेवन करत असलेलं ७५ टक्‍के मीठ हे सॉसेस, सूप्‍स, डब्‍बाबंद पदार्थ, लोणी आणि चीज अशा प्रक्रिया केलेल्‍या पदार्थांमध्‍ये असतं. हे मीठ जेवताना किंवा घरामध्‍ये बनवलेल्‍या जेवणामध्‍ये नसतं.

 • गैरसमज : असंतुलित आहार आणि व्‍यायामाच्‍या अभावामुळेच उच्‍च रक्‍तदाबाचा त्रास होतो.

सत्‍य : निश्चितच आहार आणि जीवनशैलीचा आपल्‍या रक्‍तदाबावर परिणाम होतो. पण वय, घरातील व्यक्तीला त्रास असणं यांसारखे काही न बदलता येणारे धोकादायक घटकही आहेत. जे रक्‍तदाब होण्‍यासाठी कारणीभूत ठरतात.

 • गैरसमज : नेहमीच्या मीठाऐवजी सी सॉल्‍ट / रॉक सॉल्‍ट / पिंक सॉल्‍टचा वापर करावा. त्‍यामध्‍ये सोडिअमचं प्रमाण कमी असतं.

सत्‍य : रासा‍यनिकदृष्‍ट्या या सर्व प्रकाराच्‍या मीठांमध्‍ये सोडिअमचं प्रमाण समान असतं.

 • गैरसमज : रक्तदाबाची लक्षणं दिसून येत नाहीत, म्‍हजणे उच्‍च रक्‍तदाबाची समस्या नाही.

सत्‍य : अनेकवेळा उच्च रक्‍तदाबाची लक्षणं दिसून येत नाहीत. सामान्‍यत: नियमित रक्‍तदाब तपासणी दरम्‍यानच उच्‍च रक्‍तदाब समजतो.

 • गैरसमज : घरी रक्‍तदाब तपासण्‍याची गरज नाही.

सत्‍य : घरी ईझी-टू-ऑपरेट बीपी मॉनिटर असणं चांगलं. यामुळे तुम्‍हाला रक्‍तदाबाबाबत माहिती मिळण्‍यामध्‍ये मदत होते. तसेच डॉक्‍टरांना औषधोपचार करण्‍यामध्‍ये किंवा आवश्‍यकतेनुसार औषधाचा डोस देण्यातही मदत होते.

 • गैरसमज : रक्‍तदाब नियंत्रणात आल्‍यानंतर औषधं घेणं थांबवू शकतो.

सत्‍य : उच्‍च रक्‍तदाबासाठी औषधोपचार सुरू झाल्‍यानंतर जोपर्यंत डॉक्‍टर सांगत नाहीत तोपर्यंत थांबवू नये. अनेकदा आयुष्‍यभर ही औषधं घेणं गरजेचं असतं. अचानक रक्‍तदाबाची औषधं घेणं थांबवल्‍याने ‘रिबाऊंड हायपरटेन्‍शन’ होऊ शकतो आणि हे धोकादायक असू शकतं.

पौष्टिक आणि संतुलित आहाराच्‍या सेवनामुळे उच्‍च रक्‍तदाबावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत होते.

 • अधिक प्रमाणत बीन प्रोटीन्‍सचं सेवन करा.
 • पुरेशा प्रमाणात जीवनसत्‍त्‍व ड मिळवा.
 • ओमेगा ३ फॅटी अॅसिड्सचं सेवन वाढवत आहारातील आरोग्‍यविषयक मेदाच्‍या सेवनामध्‍ये संतुलन ठेवा.
 • गरम आणि थंड पेयांमधून साखरेचे सेवन कमी करा.
 • भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्‍या खा.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter