#WorldBipolarDay- बायपोलर डिसॉर्डर म्हणजे काय?

मानसिक आजार म्हटलं की त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. बायपोलर डिसॉर्डर एक असाच मानसिक आजार आहे ज्याबाबत जनजागृती नाही. याच समस्येची माहिती दिलीये नागपूरचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रितम चांडक यांनी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

30 मार्च हा जागतिक बायपोलर डिसॉर्डस जनजागृती दिन म्हणून मानला जातो. बायपोलर डिसॉर्डर हा मानसिक आजार असून याबाबत जनजागृती फार महत्त्वाची आहे. जवळपास भारतातील 8.7 दशलक्ष लोकं या आजाराने ग्रस्त आहेत.

बायपोलर डिसॉर्डर म्हणजे काय?

बायपोलर डिसॉर्डर हा मानसिक आजार असून या आजारात लोकांच्या मूडवर परिणाम करतो. बायपोलर म्हणजे द्विध्रुवीय, ज्याच्या २ बाजू असतात. हा आजार असलेला रुग्ण काही काळ उन्मादात तर काही काळ उदासिनतेत राहतो. या दोन मूड एपिसोड असतात-

मॅनिक एपिसोड

 • अतिआनंद होणं
 • जास्त ऊर्जा असणं
 • आपण खूप मोठे आहोत असं वाटतं
 • ऐपत नसताना देखील पैसे उधळणं

डिप्रेशन एपिसोड

 • अचानक दुःखी होणं
 • मन न लागणं
 • सतत अपराधीपणाची भावना येणं
 • झोपेच्या समस्या
 • थकवा येणं
 • लक्ष केंद्रीत न होणं

बायपोलर डिसॉर्डवर उपचार?

 • जर या डिसॉर्डरचा जास्त त्रास झाला तर दैनंदिन आयुष्यात देखील त्रास होऊ लागतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणं महत्त्वाचं आहे.
 • डिप्रेशन आणि मानिया एपिसोड्सचा त्रास होऊ नये यासाठी काही औषधोपचार दिले जातात.
 • Antidepressants आणि anti-psychotics ही या आजारांची लक्षणं कमी करण्यासाठी दिली जातात.
 • या आजाराचा त्रास नेमका कशामुळे होतोय हे पाहिलं जाऊन त्यावर उपचार केले जातात.
 • डिप्रेशन दूर करण्यासाठी सायको-थेरेपी देण्यात येते.
 • जीवनशैली सुधारण्याचा सल्ला- नियमित व्यायाम करा, शारीरिक हालचाल करा, योग्य आहार घ्या.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter