या कारणांसाठी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा

महिलांनी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून नियमित तपासणी करून घेणं फार आवश्यक असतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

महिलांनी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून नियमित तपासणी करून घेणं फार आवश्यक असतं. यामुळे आऱोग्याविषयीच्या समस्या मनात राहत नाहीत. अचूक निदान आणि त्यानंतर मिळणारे योग्य ते उपचार यामुळे एखाद्या आजारावर मात करणं सहज सोप्प होतं. खाली काही कारणांसाठी महिलांनी स्त्रिरोगतज्ज्ञांची भेट अवश्य घ्यावी.

पाळीसंबंधातील समस्या

जर तुम्हाला पाळीसंदर्भात कोणत्याही समस्या असतील जसं की, क्रॅम्प्स, त्या दिवसांतील ब्लड फ्लो, अनियमित पाळी यावर तातडीने तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. यासाठी अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांना भेट द्या.

ब्रेस्ट पॅथोलॉजी

स्त्रियांनी त्यांच्या स्तनांची तपासणी ही स्वतः करावी मात्र त्यासोबतचं स्त्रिरोगतज्ज्ञांकडून देखील करून घेणं फायदेशीर ठरेल. भारतात स्तनांचा कर्करोग हा महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कोणत्याही कर्करोगामध्ये त्याचं निदान होऊन त्यावर उपचार घेतल्याने त्यावर मात करणं सोपं होतं. ५० वर्षांच्या पुढील महिलांनी मेमोग्राम आणि स्तनांची सोनोग्राफी या तपासण्या नियमितपणे केल्या पाहिजेत.

इन्फेक्शन

महिलांना कोणत्याही इन्फेक्शनची लक्षणं आढल्यास वेळीच डॉक्टरांची भेट घ्यावी. जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवणार नाही. जर छोट्या लक्षणांकडे दुलर्क्ष केल्यास गंभीर परिणामांना सोमोरं जावं लागण्याची शक्यता असते. अनेकवेळा अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास  बीजवाहिन्या(फॉलोपियन ट्यूब) खराब होऊन वंध्यत्वही येऊ शकतं.

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी थांबण्याचा काळ. अशावेळी महिलांना अनेक आऱोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनमध्ये घट झाली की, डिप्रेशन किंवा ऑस्टियोपोरोसिस अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या समस्यांवर मात करता येऊ शकते.

 

लैंगिक संक्रमित रोग

सेक्स करतेवेळी योग्य ती काळजी न घेतल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. अनेकवेळा याची लक्षणं देखील आढळून येत नाहीत. अशावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासण्यांद्वारे या प्रकारच्या समस्यांचं निदान करणं शक्य असतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)