…म्हणून ‘ती’ला कुटुंबाने टाकलं वाळीत

हेपेटायटिस-सी असल्याने गायत्रीचं कुटुंब तीला स्विकारायला तयार नाही. हेपेटायटिसबाबत लोकांमध्ये जागरूकता नाही. लोकं हेपेटायटिसला एचआयव्ही समजतात यामुळे लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचं मतं डॉक्टर व्यक्त करतायत

0
368
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अहमदनगर जिह्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. हेपेटायटिस-सी बाबत नसणारी माहिती आणि जागरूकतेचा अभाव यामुळे एका ३१ वर्षीय महिलेला तिच्या घरच्यांनी घराबाहेर काढलं. कुटुंबाला वाटलं या महिलेला एचआयव्ही झालाय, त्यामुळे या महिलेला वाळीत टाकण्यात आलं.

नगर जिह्यात राहणाऱ्या गायत्रीला दोन वर्षांपूर्वी हेपेटायटिस-सी झाल्याचं निदान झालं. गेली दोन वर्ष गायत्रीवर उपचार सुरू आहेत, पण तिच्या सारसच्यांनी तिला स्विकारण्यास नकार दिलाय. कुटुंबियांना वाटतं गायत्रीला एचआयव्हीची लागण झालीय.

गायत्रीचं कुटुंब चांगलं शिकलं, सवरलेलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तिची सासू कोल्हापुरच्या सरकारी रुग्णालयात नर्सचं काम करते. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सचिन पळनीटकर म्हणतात, “ही महिला वडीलांच्या उपचारांसाठी आमच्याकडे आली होती. जेव्हा तिने रुग्णालयात लावण्यात आलेली हेपेटायटिसची माहिती वाचली तेव्हा ती आमच्याकडे आली.”

गायत्री आमच्याकडे आठवड्याभरापुर्वी आली. आम्ही तिच्या कुटुंबियांशी चर्चा करत आहोत. त्यांचं समुपदेशन करण्याचाही प्रयत्न करतोय. पण, ते गायत्रीला स्विकारण्यास तयार नाहीत.

डॉ.पळनीटकर पुढे म्हणतात, “गायत्रीच्या शरीरात हा विषाणू कसा आला याची कोणालाच माहिती नाही, पण कुटुंबिय हे ऐकण्यास तयार नाहीत. गायत्री शिकलेली आहे, एमबीए आहे पण आता ती डिप्रेशनमध्ये जावू लागलीये.”

ते पुढे म्हणतात, “हेपेटायटिस-सी बाबत अनेक गैरसमजूती आहेत. लोकं या आजाराला एचआयव्हीच समजतात. यामुळे लोकांना वाळीत टाकण्याचे प्रकार होतात.”

माय मेडिकल मंत्राशी बोलताना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. निनाद देशमुख सांगतात, “लोकांचा हा गैरसमज आहे की हा विषाणू स्पर्शाने पसरतो. लोकांना असं वाटतं की हेपेटायटिस-बी हा आजार बरा होवू शकत नाही. यासाठी लोकांमध्ये जनजागृती महत्त्वाची आहे.”

व्हायरल हेपेटायटिस म्हणजे हवेतून पसरणारा हेपेटायटिस, हा भारतात सध्या एक मोठं आव्हान बनत चाललायं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार ५० दशलक्ष लोकं हेपेटायटिसने बाधित आहेत.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter