हार्ट फेल म्हणजे हृदय शरीराला पुरेसं रक्त पुरवू शकत नाही. त्यामुळे हा आजार जीवघेणा ठरू शकतो. थंडीच्या दिवसांत हार्ट फेलचे अनेक रूग्ण आढळून येतात असं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे.
इंटरनॅशनल कन्सिस्टिव्ह हार्ट फेल्युअर यांनी केलेल्या अभ्यासानुसार, हवेत थंडावा असेल तर हार्ट फेलमुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या तसंच यामुळे होण्याऱ्या मृत्यूंची संख्या देखील वाढते.
या परिस्थितीला कारणीभूत ठरणारे घटक
- थंड वातावरण
- धुरकं आणि प्रदूषक
असा दिवसांत घाम येत नसल्याने शरीरातील पाणी फुफ्फुसांमध्ये जमा होतं आणि यामुळे हार्ट फेल होण्याची शक्यता असते. तसंच हवामानात बदल झाल्याने श्वसनासंबंधीचे आजार देखील बळावतात.
याविषयी नवी दिल्लीच्या एम्स रूग्णालयातील कार्डियोलॉजी विभागाचे डॉ. संदीप मिश्रा यांनी निरिक्षण केलं. त्यांच्या सांगण्यानुसार, “थंडीच्या दिवसात या आजारांमुळे मृत्यूदर वाढण्याचा धोका अधिक असतो. आमच्याकडे देखील अशा दिवसांत हार्ट फेल झालेल्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते. रात्रीच्या वेळी रूग्णांची संख्या अधिक असते. हवेत थंडावा वाढला हृदयाच्या आजारांमुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढते.”
हृदयाचा आजार होण्यासाठी थंड वातावरण प्रतिकूल ठरतं. शिवाय ५० वर्षांवरील व्यक्तींना, मधुमेही आणि हायपरटेन्शन या रूग्णांना देखील हे वातावरण घातक ठरू शकतं.
थंडीच्या दिवसात हृदयासंबंधीच्या आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं
- जठरासंबंधीच्या समस्या
- खूप जास्त घाम येणं
- १५ मिनिटांपेक्षा जास्त वेदना होणं
Hi My,
I saw you tweeting about drug and I thought I’d check out your website. I really like it. Looks like My has come a long way!
keep up the good work!
Cheers!
http://linkshrink.net/7Z3yT4
Comments are closed.