पुरुषांपेक्षा महिलांना हृदयाच्या आजारांचा धोका अधिक

महिलांचा मृत्यू होण्याणागे एक प्रमुख कारण म्हणजे हृदयासंबंधीचे आजार. पुरुषांच्या तुलनेत महिलांना 10 वर्षांनंतर हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका संभवतो. त्यानुसर वयाच्या 35 ते 54 या काळात हृदयाच्या आजारांचा धोका अधिक असतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

३ पैकी एका महिलेचा मृत्यू हा हृदयासंबंधीच्या आजारांमुळे होतो. तर ३१ पैकी एका महिलेच्या मृत्यूचं कारण हे स्तनांचा कर्करोग असतो. एकंदरीत पाहिलं तर दरवर्षी हृदयाच्या आजारांनी पुरुषांपेक्षा महिलांच्या मृत्यूंची संख्या जास्त आहे. महिलांमध्ये हृदयाचे आजार होण्यामागे एक कारण म्हणजे इस्ट्रोजे हार्मोन.

महिलांमध्ये रजोनिवृत्ती नंतर शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन्समध्ये बदल होतात. आणि त्यामुळे महिलांना हृदयाच्या आजारांचा धोका संभवतो.

ज्या महिलांना रजोनिवृत्ती लवकर येते किंवा कोणत्या कारणामुळे अंडाशय काढून टाकावं लागतं अशा महिलांना हृदयाचे आजार लवकर होण्याच्या धोका असतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना १० वर्षांनंतर हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका संभवतो. मात्र अशा महिलांना पुरुषांच्या वयाप्रमाणेच हृदयाचे आजार होऊ शकतात. शिवाय महिलांना होणाऱ्या हृदयाच्या आजारासंदर्भात जनजागृतीचाही अभाव आहे.

संशोधकांनी केेलेल्या संशोधनात देखील महिलांना हृदयाचे आजार होण्यामागे इस्ट्रोजन हार्मोन असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

ज्या महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात त्यांना शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. महिलांमध्ये शक्यतो कोरोनरी हार्ट डिसीज, कोरोनरी मायक्रोवॅस्क्युलर डिसीज आणि ब्रोकेन हार्ट सिंड्रोम हे हृदयासंबंधीचे आजार सामान्यपणे दिसून येतात.

हृदयाच्या आजारामुळे रूग्णालयात दाखल करण्याची संख्या पुरुष आणि महिला यांची संख्या सारखीच आहे. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिला रूग्णालयात जास्त काळ दाखल राहतात. हृदयासंबंधीचे आजार होण्यामागे जीवनशैलीशी संबंधीतही घटक कारणीभूत असतात. जसं की आहार, व्यायाम, तंबाखूचं सेवन, मद्यपान इत्यादी. त्यासोबतच अति प्रमाणात वजन, ताण-तणाव आणि डिप्रेशन हे घटकही कारणीभूत असतात. मुख्य म्हणजे या कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये बदल होऊ शकतात.

लठ्ठपणा, हायपरटेन्शन, मधुमेह, कोलेस्ट्रॉल या वैद्यकीय समस्यांमुळे देखील हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. ज्या महिलांना मधुमेह आणि हृदयाचे आजार असतात त्यांना मृत्यूचा धोका अधिक असतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter