आयव्हीएफ बाळाचा विचार… ‘हे’ लक्षात ठेवा

ज्या दाम्पत्यांना काही कारणामुळे मूल होत नाही, असे दाम्पत्य बाळासाठी आयव्हीएफ म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन करण्याचा निर्णय घेतात. आयव्हीएफमुळे गर्भधारणा यशस्वी होईल की नाही हे सांगता येत नाही, ते परिस्थितीवर अवलंबून आहे. मात्र अशा दाम्पत्यांनी आवश्यक ती काळजी घेतल्यास आयव्हीएफ यशस्वी होण्याची शक्यता वाढवता येते. याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ आणि ककुन फर्टिलिटीच्या संचालिका डॉ. अनघा कारखानीस यांनी अधिक मार्गदर्शन केलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) सहाय्यक प्रजनन थेरपीत वापरली जाणारी सर्वसामान्य पद्धत आहे, ज्यात गर्भारपणाच्या मदतीसाठी पुष्कळशा जटिल उपायांच्या शृंखला येतात. जेव्हा एखाद्या जोडप्याला काही ठराविक वंध्यत्वाच्या समस्या असतात किंवा काही वेळा आनुवांशिक समस्या असतात तेव्हा आयव्हीएफचा वापर केला जातो.

वंध्यत्वाच्या उपचारात वय खूप महत्त्वाचं असतं. पुरुष आणि महिलांमध्येही वाढत्या वयाप्रमाणे प्रजनन क्षमता कमी होते. महिलांमधील प्रजनन क्षमता वयाच्या तिशीनंतर झपाट्याने कमी होते आणि पस्तीशीनंतर फारच कमी होते. अंडाशयात निर्माण होणार्‍या बीजांडांची संख्या आणि प्रत दोन्ही कमी होतात ज्यामुळे गर्भ रहाण्याची शक्यताही कमी होतो. पुरुषातील प्रजनन क्षमताही वयाच्या चाळीशीनंतर हळूहळू कमी होते, तरीही बहुतेक पुरुष वयाच्या पन्नाशीतही वडील होऊ शकतात.

सरासरीत सुमारे ८५ टक्के जोडप्यांना प्रयत्न सुरू केल्यापासून एका वर्षात गर्भधारणा होते. जर बाळाची योजना करताना समस्या येत असतील तर हे मुख्य मूलभूत नियम लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

  • जर आपले वय ३५ वर्षांचे असेल तर एक वर्ष प्रयत्नानंतर व्यावसायिकाची मदत घ्या.
  • जर आपण ३५-४० वर्षांचे असाल तर सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांना भेटा.
  • जर आपण ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल, तर प्रजनन क्षमता पहिल्यांदाच तपासून घ्यावी. जर तसे केले
  • नाही, तर तीन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर तज्ज्ञांची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.

आयव्हीएफ उपचारांवर वयाचा जास्त प्रभाव पडू नये म्हणून आपण आणि आपल्या डॉक्टरांनी मिळून ही प्रक्रिया आपल्यावर यशस्वी होऊ शकते असे ठरवल्यानंतर लगेचच आपली आव्हीएफ सायकल सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणेची शक्यता जरी आपल्या खास बाबतीत पूर्णपणे परिस्थितीजन्य असली तरी काही गोष्टींमुळे गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतो.

हे करा

1) योग्य ते खा – आपण जे अन्न खातो त्यानुसार आपलं दीर्घकाळाचं स्वास्थ्य, मानसिक चापल्य आणि प्रजनन क्षमता बनते.

  • ताजी फळे – फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. डाळिंबाचा रस शुक्राणूची प्रत वाढवतो आणि टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनास प्रोत्साहन देतो.
  • हिरव्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ – भाज्या आणि प्रथिनांनी भरपूर असलेला आहार, बीजाणू आणि शुक्राणूंची प्रत सुधारतो. पालेभाज्या, पनीर, टोफू जास्त खाल्यास प्रथिने जास्त मिळतात आणि त्यामुळे गर्भधारणेचा संभव वाढतो.
  • व्हिटॅमिन सी आणि जस्ताची पुरके घ्या आणि आपल्या आवडीची कोणतीही मल्टीव्हिटॅमिन घेतल्यास उत्तमच मदत होईल. हे उपचार प्रजनन उपचार सुरू करण्यापूर्वी किमान ३ महिने आधीपासून घ्यावेत.
  • आहारात आवश्यक फॅटी अॅसिड – सर्व चरबी वाईट नसते. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 तेल जसे सैलॉन, सरडीन्स, हेरिंग्स आणि मॅकेरल सारख्या तेलकट माशांमध्ये आढळतात, ज्याची शरीराला गरजेच्या चरबीसाठी आवश्यकता असते. म्हणून त्यांना आपल्या आहारात समाविष्ट करा. शाकाहारी हे गोळ्याच्या स्वरुपात मिळवू शकतात.

2) योग्य वजन राखा- लठ्ठपणामुळे अंडकोषाच्या क्रियेत बाधा येऊन स्त्रियांवर परिणाम होतो. ज्या महिला कमी वजनाच्या आहेत त्यांचं अंडकोशांच्या समस्येचं जोखीम वाढतं ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. प्रत्येकास योग्य बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) राखून ठेवण्याचं लक्ष्य ठेवलं पाहिजे जेणेकरुन वंध्यत्व टाळता येईल. पुरुषांमधील लठ्ठपणा शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गतिशीलता प्रभावित करू शकतो. जास्त वजन हार्मोनमध्ये बदल घडवतात ज्यामुळे वंध्यत्वाचं कारण होऊ शकतं.

3) ताणरहित रहा – आयव्हीएफच्या ताणाचे, विश्रांती आणि निरोगीपणाकडे नेणारी कामे करून संतुलन राखा. कारण जास्त ताण असल्यामुळे जीवनातील इतर ताण किमान राखण्याची काळजी घ्या.

4) कुशल आणि ज्ञानी प्रजनन विशेषज्ञ निवडा – हे सुनिश्चित करा की डॉक्टर पुनरुत्पादक औषधांमध्ये तज्ज्ञ आहेत. डॉक्टरांना आपल्याला मदत करण्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य आणि समज असणं आवश्यक आहे.

5) डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करा – ह्यात भरपूर विश्रांती घेणे, योग्य खाणे आणि दिलेली औषधे वेळेवर घेणं येतं.

हे करू नका

1) काही ठराविक मासे खाणे टाळा – शार्क, मॅकरिल यासारखे काही ठराविक मासे उपचारांच्या पूर्ण काळात खाण्याचे टाळा कारण त्यात मर्क्युरी (पारा) जास्त प्रमाणात असतो आणि जो अपायकारक आहे.

2) धूम्रपान थांबवा – पुरुष आणि महिला दोघांनीही धूम्रपान केल्यास प्रजननाचा संभव कमी होतो. महिलांमध्ये धूम्रपानामुळे अंडाशय म्हातारे होते आणि बीजाणूंचा पुरवठा कमी होतो. ह्यामुळे गर्भपतनाचा संभवही वाढतो. पुरुषांत धूम्रपानामुळे शुक्राणूंची संख्या आणि प्रत कमी भरते कारण त्यात शुक्राणू डीएनएचे विखंडन वाढवते.

3) आपले अंडकोष चांगले ठेवा – शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी एखाद्या पुरुषाचे अंडकोष त्याच्या उर्वरित शरीरापेक्षा एक किंवा दोन अंश थंड असावे. घट्ट चड्ड्या, खूप गरम पाण्याची आंघोळ आणि काम करण्यासाठी थेट मांडीवर ठेवलेले लॅपटॉप, अंडकोषांचे तापमान वाढवते आणि शुक्राणूंचे उत्पादन कमी करते आणि त्यामुळे हे टाळले पाहिजे.

4) नकारात्मक लोकांचे ऐकू नका – प्रत्येक जोडप्याची परिस्थिती आणि बाब वेगळी आहे. दुसर्‍या जोडप्याने यश मिळवले नसते, परंतु त्यांची परिस्थिती आपल्यासारखी नसू शकते.

आपण निकालांवर परिणाम करण्यास सक्षम नसाल, मात्र आपण आपल्या उपचारांना यशस्वी करण्यासाठी या ‘करा आणि करू  नका’ गोष्टींचं अनुसरण करून आयव्हीएफ प्रक्रियेत नक्कीच मदत करू शकता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter