अॅलर्जी म्हणजे नेमकं काय?

अॅलर्जी म्हणजे नेमकं काय हे याचा कधी विचार आपण करत नाही. यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय अॅलर्जी म्हणजे नेमकं काय?

womens coughing
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अनेकांना अॅलर्जीचा त्रास असतो. अॅलर्जीवर कशा प्रकारे मात करता येईल याचा आपण विचार करतो. मात्र अॅलर्जी म्हणजे नेमकं काय हे याचा कधी विचार आपण करत नाही. यासाठी आम्ही जाणून घेतलंय अॅलर्जी म्हणजे नेमकं काय?

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना मुंबईतील जे.जे समूह रूग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण म्हणाले, “अॅलर्जी म्हणजे ज्यावेळी आपलं शरीर एखाद्या गोष्टीला हायपर रिस्पॉन्स करतं. अॅलर्जी म्हणजे इन्फेक्शन हा गैरसमज आहे. मुख्य म्हणजे अॅलर्जी हे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसतं, आपल्या शरीराने तयार केलेला एक हायपर रिस्पॉन्स असतं. आणि या अॅलर्जीचे प्रकार देखील वेगवेगळे असतात.”

डॉ. चव्हाण पुढे म्हणाले, “अॅलर्जी ही धुळीची, एखाद्या गोष्टीच्या रिअॅक्शनची किंवा औषधांची असू शकते. इतकंच नव्हे तर अॅलर्जीची लक्षणंही विविध असतात. यामध्ये हाता पायाला सूज येणं, घशाला सूज येणं किंवा घसा कोरडा पडणं अशा तक्रारी जाणवतात.”

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अनेकांना धूळीचा फार त्रास होतो. त्यामुळे बहुतांश लोकांमध्ये allergic rhinitis चे रूग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात. मुख्य म्हणजे अॅलर्जी जर दीर्घकाळ राहिली तर त्याचे इतरही परिणाम आरोग्यावर होताना दिसतात.

डॉ. चव्हाण यांच्या म्हणण्याप्रमाणे, “आमच्या ओपीडीमध्ये allergic rhinitisचे अनेक रूग्ण आढळून येतात. जर ही अॅलर्जी दीर्घकाळ राहिली तर व्यक्तीच्या कानावरही परिणाम होतो. यामुळे कमी ऐकू येण्याची समस्या उद्भवते. हा त्रास शक्यतो 20-40 वयोगटातील व्यक्तींना होत असून सकाळी चालायला जाणाऱ्या किंवा कंस्ट्रक्शनच्या भागात काम करणाऱ्या व्यक्तींना हा त्रास अधिक होतो.”

अॅलर्जीवर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. प्रतिबंध करणं हा एकच यावरील सर्वोत्तम उपाय आहे. यासंदर्भात डॉ. चव्हाण म्हणतात, “अॅलर्जी झालेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात देखील अनेक समस्या येतात. त्यामुळे अॅलर्जी होण्यापासून प्रतिबंध करणं हा एकच उपाय आहे.”

हे देखील वाचा :- फूड अॅलर्जी होण्याची कारणं आणि त्यावर उपाय!

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter