काय आहे ‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’?

डेंग्यू शॉक सिंड्रोम’ हा डेंग्यूच्या संसर्गापैकी एक प्रकार आहे. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा ज्यांना दुसऱ्यांदा डेंग्यू झालाय त्यांना याचा धोका अधिक असतो. डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, यावर तात्काळ उपचार झाले तर रुग्णाचा जीव वाचवणं शक्य आहे.

0
130
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात अचानक घडली की, त्या गोष्टीचा आपल्याला शॉक लागतो. जवळच्या व्यक्तीचं अचानक निधन, जीवघेणा अपघात किंवा इतर गोष्टी. पण एखाद्या आजाराचाही शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’ हा डेंग्यूच्या संसर्गापैकी एक प्रकार आहे. यामध्ये डेंग्यूच्या संसर्गासोबत ओटीपोटात दुखणं आणि ताप या तक्रारीही उद्भवतात. ही परिस्थिती तरूण आणि प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त दिसून येते. यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. हा आजार वाढला तर रूग्णाचे प्राण वाचवणं कठीण होतं.

ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते किंवा ज्यांना दुसऱ्यांदा डेंग्यू झालाय त्यांना ‘डेंग्यू शॉक सिंड्रोमचा’ धोका अधिक असतो. यासोबतचं आजारी व्यक्तीला देखील ही समस्या उद्भवू शकते. डेंग्यू  शॉक सिंड्रोमचं निदान करणंही फार कठीण असतं. या आजारामुळे आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज लावता येणं शक्य नाही. आतापर्यंत तरी, डेंग्यूवर प्रभावी उपचार पद्धती किंवा लस उपलब्ध नाहीये.

डेंग्यू शॉक सिंड्रोमची लक्षणं

  • ओटीपोटात दुखणं
  • सतत उलट्या होणं
  • अस्वस्थता जाणवणं
  • प्लेटलेट्सची संख्या कमी होणं

शॉक सिंड्रोम ही परिस्थिती डेंग्यूचा संसर्ग झाल्यानंतर शक्यतो २ ते ७ दिवसांनी दिसून येते. यावेळी रूग्णाला थुंकीतून रक्त पडणं, छातीत जळजळणं, न्यूमोनिया, अशक्तपणा या तक्रारी देखील येऊ शकतात.

काय खबरदारी घ्याल?

  • लक्षणं आढळल्यास डेंग्यूची चाचणी करून घ्या
  • राहत असलेला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा
  • आजूबाजूच्या परिसरात पाणी साठू देऊ नका
  • डास चावणार नाहीत यासाठी काळजी घ्या
  • चांगली जीवनशैली जोपासा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter