व्यायाम केला नाही तर काय होईल?

नियमित व्यायाम म्हणजे फक्त अतिरिक्त कॅलरीज घटवणे, स्नायूंना आकार देणं नव्हे तर यामुळे तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मला नाही आवडत ते जीमला वगैरे जायला किंवा नियमित व्यायाम करायला… मी जसे आहे, तसेच ठीक आहे… तुम्हाला असं वाटत असेल… मात्र फक्त स्लीम ट्रिम राहण्यासाठीच जीमला जायला हवं किंवा व्यायाम करायला हवं असं नाही.  नियमित व्यायाम म्हणजे फक्त अतिरिक्त कॅलरीज घटवणे, स्नायूंना आकार देणं नव्हे तर यामुळे तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं. व्यायाम न केल्यानं काय होऊ शकतं जाणून घेऊयात.

लठ्ठपणा

तुम्ही जर सतत फॅट आणि कॅलरीजयुक्त पदार्थ खात असाल आणि व्यायाम करत नसाल, तर तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतील. यामुळे तुमचं वजन वाढेल किंवा तुम्ही लठ्ठ व्हाल. यामुळे तुमचा आत्मविश्वासही ढासळेल, ज्याला परिणाम अप्रत्यक्षरित्या तुमच्या आरोग्यावर होईल.

 

हृदयाचे आजार

व्यायाम न केल्यानं उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते, तसंच शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. रक्तदाब आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं म्हणजे हृदयाच्या आजारांचा धोका वाढणं. व्यायाम न करून तुम्ही तुमचं हृदय धोक्यात घालत आहात.

अशक्तपणा

नियमित व्यायाम केल्यानं स्नायू मजबूत होतात. जर तुम्ही नियमित व्यायाम केला नाही तर तुमचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. परिणामी तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. स्नायूंना कार्यशील ठेवण्यासाठी शारीरिक कार्य करत राहायला हवेत.

ताणतणाव कमी होतो

सध्या प्रत्येकाला ताणतणाव आहे. ताणतणावापासून मुक्ती मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी एक म्हणजे व्यायाम. व्यायामामुळे मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स उत्तेजित होतात. जे लोक चिडचिडे आहेत, रागिष्ट आहेत, ज्यांचा स्वभाव बदलत असतो, त्यांच्यासाठी व्यायाम फायदेशीर आहे.

हाडांच्या समस्या

नियमित व्यायाम न केल्यानं हाडांवर दुष्परिणाम होऊ शकतात. जसजसं तुमचं वय वाढतं तसं हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. सांध्यांना कार्यशील ठेवेल असा व्यायाम नियमित करावा असा सल्ला डॉक्टर देतात. चालणं, धावणं, नाचणं इ. साध्यासोप्या व्यायामामुळे सांधे मजबूत राहतात.

सोर्स – हेल्दी बिल्डर्झ

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here