‘अरे यार पिंपल… एका रात्रीत कुठून आलं…’ सकाळी उठल्या उठल्या आरशात चेहरा पाहताच अनेकांची मॉर्निंग गूड होण्याच्या आधीच असं सरप्राईझ मिळतं. एका रात्रीत चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि याला कारण म्हणजे तुमच्या सवयी आहेत.
उशांचे कव्हर न बदलणे
उशांच्या कव्हरवर धूळ असते, तसंच तुमच्या केसातील तेलही असते. त्यामुळे उशीवर अनेक बॅक्टेरिया जमा होतात आणि तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी उशांचे कव्हर बदलावेत.
कुशीवर किंवा पोटावर झोपणे
अशा स्थितीत झोपल्यानं तुमचे केस तेलकट असल्यास चेहऱ्याच्या त्वचेला लागतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येतात. त्यामुळे जर तुम्ही असं झोपत असाल तर केस चेहऱ्यापासून लांब राहतील अशा तऱ्हेनं बांधा.
झोपताना चेहरा न धुणे
तज्ज्ञांच्या मते दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ केला पाहिजे. यामुळे त्वचेवरील बॅक्टेरिया दूर होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत.
टॉवेल न बदलणे
तुम्ही चेहरा पुसायचं टॉवेल बदलत नसला, तेच वापरत असाल, तर त्या टॉवेलवरील बॅक्टेरिया चेहऱ्यावर जाऊ शकतात.
रात्री उशिरा खाणे
रात्री झोपायच्या आधी गोड पदार्थ खाण्याची सवय असेल, तर यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि यामुळे पुरळची समस्या तीव्र होते. रात्री झोपण्याच्या आधी काही खाल्ल्यानं ऊर्जा वाढते आणि त्याचा झोपेवर परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्यास glucocortisoid हा स्टेरॉईड स्रवतो ज्यामुळे पिंपल्स येतात.
झोपण्याच्या खोलीत हवा खेळती नसणे
खोलीतील तापमान दमट असेल तर त्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रं विस्तारतात. उष्म तापमानात घाम येतो आणि त्यामुळे छिद्रं बंद होतात आणि ब्लॅकहेड्स, ब्रेकआऊट्स या समस्या निर्माण होतात. खोलीचं तापमान 18 ते 20 अंश सेलल्सिअस असायला हवं.
जास्त ताण घेणे
जास्त ताण घेतल्यानं त्वचेतून तेलनिर्मिती होते आणि त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी ध्यानधारणा करा किंवा आवडती गाणी ऐका, यामुळे तुम्ही तणावमुक्त व्हाल.
रात्री उशिरा झोपणे सकाळी लवकर उठणे
पुरेशी झोप न मिळाल्यानं glucocorticoid ची निर्मिती होते आणि पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे हे टाळायचं असल्यास नियमित किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे.
पिंपल्स हातानं फोडणे
पिंपल्स हातानं फोडू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे तुमच्या त्वचेला जखमही होऊ शकते. याशिवाय आणखी पिंपल्स येऊ शकतात.
सोर्स – हेल्थ डायझेट