नॅशनल कमिशन विधेयक- एम्सच्या डॉक्टरांनी पुकारला संप

नॅशनल कमिशन विधेयकाच्या निषेधार्थ एम्स ते संसद भवन असा त्यांनी मार्च काढला होता. इतकं मोठं पाऊल उचलूनही काही फायदा न झाल्याने एम्सच्या निवासी डॉक्टरांनी काम बंद करत संप पुकारलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नॅशनल कमिशन विधेयकाविऱोधात मंगळवारी दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेच्या डॉक्टर रस्त्यावर उतरले होते. या विधेयकाच्या निषेधार्थ एम्स ते संसद भवन असा त्यांनी मार्च काढला होता. इतकं मोठं पाऊल उचलूनही काही फायदा न झाल्याने एम्सच्या निवासी डॉक्टरांनी काम बंद करत संप पुकारलाय.

नॅशनल कमिशन विधेयक हे डॉक्टरांच्या विरोधात असल्याने, डॉक्टरांचा याला विरोध आहे. या विधेयकातील अनेक मुद्द्यांवर डॉक्टरांना आक्षेप आहे. आयुर्वेद आणि होमियोपॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिससाठी ब्रीजकोर्स, आणि एमबीबीएस झाल्यानंतर प्रॅक्टिससाठी पुन्हा एक परिक्षा हे मुद्दे डॉक्टरांना मान्य नाहीत.

यावर चर्चा करण्यासाठी एम्सच्या निवासी डॉक्टरांची संघटनेने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी नड्डा आणि संसदीय समितीचे अध्यक्ष यांना नॅशनल कमिशन विधेयकावर चर्चेसाठी वेळ मागितली होती. शिवाय मान्य नसलेले मुद्दे विधेयकातून काढून टाका अशी मागणीही पत्राद्वारे मागणीही केली होती. मात्र याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

याविषयी माय मेडिकल मंत्राशी बोलतना एम्सच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. हरजित सिंह भाटी म्हणतात, “एम्सचे निवासी डॉक्टर आणि सफदरजंग रूग्णालयाच्या डॉक्टरांनी काम बंद कऱण्याचा निर्णय घेतला. आम्ही काम पूर्णपणे बंद ठेवलंय. फक्त आपत्कालीन सुविधा आणि बाह्यरूग्ण विभाग सुरु ठेवलाय.”

डॉ. भाटी पुढे म्हणाले की, “यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी नड्डा यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटण्यास बोलावलय. म्हणून आरोग्य सचिव आणि दक्षिण दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांसोबत केंद्रीय आरोग्यमंत्र्याची भेट घेणार आहोत.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)