चांगल्या झोपेसाठी सोशल मिडीयापासून दूर रहा!

सोशल मिडीया वापरण्यासाठी दिला जाणारा वेळ कमी केला तर चांगली झोप लागण्यास मदत होते. एका संशोधनाच्या माध्यमतून हे स्पष्ट झालंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

फेसबूक, ट्विटर, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम याशिवाय सध्या आपला दिवसचं जात नाही. नोटीफिकेशन आलं की लगेच आपण हातात फोन घेतो. रात्री झोपेत देखील अनेकांना फोन पाहायची सवय असते. परिणामी झोप पूर्ण होत नाही. संपूर्ण दिवसातील किती वेळ आपण सोशल मिडियावर वाया घालवतो याचा आपल्याच पत्ता नसतो. मात्र तुम्हाला जर पुरेशी जोप हवी असेल तर सोशल मिडियावर दिला जाणारा वेळ कमी करणं गरजेचं आहे.

नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, सोशल मिडीया वापरण्यासाठी दिला जाणारा वेळ कमी केला तर चांगली झोप लागण्यास मदत होते.

व्यक्ती सोशल मिडीया आणि अपुरी झोप यामधील संबंध तपासून पाहण्यासाठी संशोधकांनी अभ्यास केला. या अभ्यासात २००० व्यक्तींचा समावेश करण्यात आला. या व्यक्तींना त्यांच्या झोपेच्या सवयींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून असं लक्षात आलं की,

  • सोशल मिडीया वापरणारे जवळपास ६२ टक्के व्यक्ती रात्री उठून फोन चेक करतात. परिणामी त्यांना पुरेशी झोप मिळत नाही.
  • १६ ते २४ वयोगटातील ४३ टक्के मुलांच्या सांगण्यानुसार, दिवसभर सोशल मिडीयाचा वापर न करणं त्यांना जमत नाही
  • तर २७ टक्के मुलांच्या सांगण्याननुसार, सोशल मिडीयाचा वापर केला नाही तर शांत वाटतं आणि त्यांना पुरेशी झोप मिळते

स्लिप एक्सपर्ट नेरिना यांच्या सांगण्यानुसार, “सध्याच्या काळात मोबाईलवर संपूर्णपणे बंधन घालणं शक्य नाहीये. मात्र लोकांनी आपण किती वेळ सोशल मिडीयावर व्यतित केला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. अधिक काळ सोशल मिडीयावर वाया घालवल्याने पुरेशी झोप मिळत नाहीये. त्यामुळे सोशल मिडीयावरचा वेळ कमी करणं गरजेचं आहे.”

संशोधकांच्या सांगण्यानुसार, झोपण्यापूर्वी ६०-९० मिनिटं अगोदर सोशल मिडीयाचा करू नये. रात्री झोपताना फोन सायलेंटवर ठेवावा जेणेकरून मोबाईलचा आवाज येऊन झोपमोड होणार नाही.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter