‘या’ कारणांनी होतंय ध्वनी प्रदूषण

दररोज मुंबईकरांना ध्वनी प्रदूषणाला सामोरं जावं लागतं. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. ध्वनीप्रदूषण कोणत्या पद्धतीने टाळू शकतो याची माहिती दिलीये जसलोक आणि ब्रिज कॅन्डी रूग्णालयाच्या कान-नाक-घसा यांच्या तज्ज्ञ आणि मानेच्या सर्जन डॉ. डिल्लोन डिसूजा यांनी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मोठ्या आवाजात गाणी ऐकणं, टीव्ही पाहणं, फोनवर मोठ्याने बोलणं असा अनेक प्रकारच्या मोठ्या आजावांची सवय असते. याशिवाय रात्रीच्या वेळी रस्त्यावर असणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाज, प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज या आवाजांची आपल्याला सवय झालेली आहे. या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यातील एक भाग आहेत आणि शक्यतो त्या आवाजाने आपल्याला त्रास होत नाही. ज्यावेळी हा त्रास आपली झोपमोड करतो किंवा डोकेदुखी बनतो त्यावेळी ते ध्वनी प्रदूषण बनतं.

अनैसर्गिक गोष्टींच्या माध्यमातून अतिशय मोठा आणि कर्कश आवजा होणं म्हणजे ध्वनी प्रदूषण.

ध्नवी प्रदूषणाची कारणं-

औद्योगिकरण

आपल्या शहरात होणारं औद्योगिकरण हे शक्यतो वस्ती जवळ असलेल्या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. त्याठिकाणी होणाऱ्या एका मशिनाचा आवाज हा 110 ते 115 डेसिबलपेक्षा जास्त असतो.

कार्यक्रम

लग्न, पार्टी, पब, डिस्को अशा ठिकाणी शक्यतो नियमांचं उल्लंघन होताना दिसतं. याठिकामी मोठ्या आवाजात गाणी आणि लोकांच्या गडबडीचा आवाज फार जास्त असतो.

वाहतूक

वाहतूकीचे नियम न पाळणं, गाड्यांचा सतत होणारा आवाज याशिवाय बाईक आणि जड वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण अधिक प्रमाणात होतं

बांधकाम

ब्रिज, इमारत, स्टेशन, रस्ते, फ्लायओव्हर यांचं बांधकाम जगात कोणत्याही ठिकाणी होतं. मुंबईमध्ये घरांची वाढलेली मागणी पाहता नवीन इमारतींची नव्याने बांधकाम केली जातात.

घरातील गोष्टी

आपल्या घरातच असणाऱ्या अनेक गोष्टींमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होते. घरातील गोष्टी जसं की, टीव्ही, मोबाईल, मिक्सर, प्रेशर कूकर, वॉशिंग मशिन इत्यादी. कदाचित या प्रदूषणामुळे आपल्याला जास्त त्रास होत नाही मात्र याचे दूरगामी परिणाम दिसून येतात.

ध्वनी प्रदूषण कसं टाळता येईल?

  • रस्त्यांच्या कडेला झाडं लावा
  • आवाजाच्या मशिन विशिष्ट खोलीत बसवा
  • घरात साऊंड प्रुफिंग करून घ्या
  • इलेक्ट्रॉनिक गोष्टीचा वापर झाल्यावर ती बंद करा
  • वॅक्युम क्लिनर आणि मिक्सर कमी काळाकरता वापरा
  • रेडियो, टीव्ही किंवा गाणी ऐकताना त्यांचा आवाज कमी ठेवा.
  • क्लब, बार, पार्टीमध्ये मोठ्याने आवाज करणं टाळा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter