नागपूर- अतिजोखमीच्या गर्भवतींवरील उपचारांसाठी परिषदेचं आयोजन

अतिजोखमीच्या गर्भवती महिलांची कशी काळजी घ्यावी, कोणते उपचार करावे याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना माहिती देण्यासाठी Nagpur obstetrics and Gynaecological society या संस्थेद्वारे नागपूरमध्ये GESTOSIS-2018 या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.

0
448
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

अतिजोखमीच्या गर्भवती महिलांची कशी काळजी घ्यावी, कोणते उपचार करावे याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना माहिती देण्यासाठी Nagpur obstetrics and Gynaecological society  या संस्थेद्वारे नागपूरमध्ये GESTOSIS-२०१८ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. २७ ते २९ जुलै रोजी ही तीन दिवसीय परिषद भरणार आहे. या परिषदेत मुंबईसह देशभरातून मोठ्यासंख्येनं स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होतील.

या परिषदेत या विषयांवर चर्चा केली जाईल

  • मातामृत्यू दर रोखण्यासाठी काय करता येईल
  • गरोदरपणात वाढणारा ताणतणाव
  • अॅनिमियाचं वाढतं प्रमाण
  • थॅलेसेमिया
  • गर्भपाताचं वाढतं प्रमाण
  • शरीरावर होणारे दुष्परिणाम
  • लठ्ठपणा
  • गरोदरपणात होणारे संसर्गजन्य आजार व आजाराचं लवकर निदान

विशेषतः मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे प्रमाण घटताना दिसून येत नाहीये. त्यामुळे मातामृत्यू कमी व्हावा यासाठी राज्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएमए) ही योजना सुरू केली. या योजनेतंर्गत अनेक गर्भवती महिलांवर उपचार सुरू आहेत.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण आणि दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा उत्तम नसल्याने अतिजोखमीच्या महिलांचा बाळंतपणात झालेल्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू होतो. यामुळे गर्भवती महिलांची कशाप्रकारे काळजी घ्यावी, त्यांच्यावर कोणते उपचार करावेत, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्त्री रोगतज्ज्ञांची परिषद भरवण्यात आलीये.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना Nagpur obstetrics and Gynaecological society च्या सचिव आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख म्हणाल्या, ‘‘अनेकदा गरोदर महिलांना आधीपासूनच उच्च रक्तदाब, मधुमेह, वारंवार गर्भपात, हृदयाचा आजार असतो. अशा महिलांची डॉक्टरांना विशेष काळजी घ्यावी लागते. माता व बालमृत्यू होण्याची शक्यता यामुळे बळावते. म्हणूनच Nagpur obstetrics and Gynaecological societyद्वारे नागपूरच्या GESTOSIS-2018  या परिषदेच आयोजन केलंय. या परिषदेत देशभरातील तज्ज्ञ स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणारेत.’’

‘‘गावखेड्यातील महिलांना पौष्टीक आहार मिळत नसल्याने त्यांच्यात अशक्तपणा वाढतो. यामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होऊन गर्भवती महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण वाढतं. याबाबत गर्भवतींमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने मातृसेवा संघ या स्वयंसेवी संस्थेमार्फेत गरोदर महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे’’, असंही डॉ. देशमुख यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter