दिवाळीसाठी खास डाएट प्लान

दिवाळीच्या दिवसांत घराघरांत अनेक पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ तळणीचे आणि गोड असल्याने शरीरात कॅलरीज वाढण्यास मदत होते. यासाठी आहारतज्ज्ञांनी डाएटच्या टीप्स सांगितल्यात.

दिवाळीमुळे वाढलेलं वजन कसं कमी कराल?
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दिवाळीचा सण म्हटलं की डोळ्यासमोर खाण्याचे तऱ्हेतऱ्हेचे आणि चविष्ट पदार्थ येतात. अशा दिवसात तर फराळातील पदार्थांमधलं एका वेळी काय खाऊ आणि काय नको असं होतं. यावेळी आपण कोणताही विचार न करता भरपूर पदार्थ खातो. गोड –तिखट असे अनेक पदार्थ आपण खातो. मात्र सावधान याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत नाही ना, याचा विचार अवश्य करा.

यासाठी यंदाच्या दिवाळीमध्ये तज्ज्ञांनी आपल्याला खास डाएट प्लान आखून दिलाय.

माय मेडिकल मंत्राशी फॅमिली वेलफेअर ब्युरोच्या आहारतज्ज्ञ सईन मुलानी म्हणाल्या, “सणासुदीच्या दिवसांत किती प्रमाणात खावं हे पाहणं गरजेचं राहिलं. अशा दिवसांत आपल्या आहारात समतोल आहार असणं गरजेचं आहे. जर कोणी तुम्हाला गोड खाण्यासाठी जबरदस्ती करत असेल आणि तुम्हाला नीट डाएट फॉलो करायचं असेल तर त्यांच्याशी खोटं बोला. त्यांना सांगा की तुमचा उपवास आहे.”

तर औंध सिव्हिल रूग्णालयाच्या डॉ. आशा पाटील म्हणाल्या की, “या दिवसांत प्रत्येकाने व्यायाम करावा. धान्य आणि फळांचा आहारात समावेश करावा. दिवाळीत जो फराळ बनवल तो शक्यतो घरीच तयार करा. शिवाय फराळ तयार करताना तळण्यापेक्षा भाजलेले पदार्थ बनवा.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter