हिवाळ्यात केस आणि त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

हिवाळ्यात त्वचा आणि केस यांच आरोग्य देखील जपावं लागतं. घरात गरमी आणि बाहेर थंडीचं वातावरण यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

वातावरणातील बदल आता जाणवू लागतोय. रात्री आणि सकाळी वातावरणात थंडी जाणवतेय. वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप पसरण्याची शक्यता असतेच. मात्र त्याचसोबत हिवाळ्यात त्वचा आणि केस यांच आरोग्य देखील जपावं लागतं. घरात गरमी आणि बाहेर थंडीचं वातावरण यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

उन्हळ्यात आणि हिवाळ्यात दोन्ही ऋतुंमध्ये केस आणि त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. कडक हिवाळा असल्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. शिवाय पुरळ येणं, सोरायसिस अशा समस्या देखील उद्भवण्याची शक्यता अधिक असते. याचप्रमाणे केसांवरही परिणाम होतो केस कडक होईऩ त्यामध्ये कोंडा होतो. यामुळे केसगळतीची समस्या उद्भवू शकते.

हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल?

 • केसांसाठी माईल्ड शॅम्पू वापरा
 • आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अन्टी डँड्रफ शॅम्पूने केस धुवा
 • आठवड्यातून एकदा कंडिशनरचा वापर करा
 • केस धुण्याच्या अगोदर केसांना तेलाने मसाज करा
 • केस धुतल्यानंतर केसांना सिरम लावा

केसांचं आरोग्या चांगलं रहावं यासाठी कॅल्शियम आणि बायोटीन असेलल्या  घटकांच्या पदार्थांचा आहारात समावेश करा. जसं की, अंड, मासे, काजू, बेरी, हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, ताक, दही इत्यादी. यामुळे केसगळतीची समस्या उद्भवणार नाही.

त्वचेची कशी काळजी घ्याल?

 • रात्री झोपताना मेकअप काढून टाकावा.
 • कडक गरम पाण्याने अंधोळ करू नका. अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा.
 • फेशियल क्लिनसरने दिवसातून किमान दोन वेळा चेहरा धुवा
 • त्वचेला नियमितपणे मॉइश्चरायझर लावा
 • बाहेर जाताना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या सनस्क्रिनचा वापर करा
 • अशा दिवसांत शक्यतो साखरयुक्त पदार्थ किंवा पेयं टाळा
 • 6-8 तासांची झोप घ्या
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter