ऑफिसमध्ये रहा ‘स्ट्रेस फ्री’

बदलत्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्ये ताणतणावाची समस्या दिसून येते. ऑफीसमध्ये असणाऱ्या विविध गोष्टी आणि कामाचा भार यामुळे तणावात भर पडते. कामाच्या ठिकाणी ताणतणावाची लक्षणं आपण सहसा दुर्लक्ष करतो. यासाठी डॉ. मधुमिता घोष यांनी तणावाची लक्षणं सांगितलीयेत.

0
147
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बदलत्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्ये ताणतणावाची समस्या दिसून येते. ऑफीसमध्ये असणाऱ्या विविध गोष्टी आणि कामाचा भार यामुळे तणावात भर पडते. व्यक्तींमध्ये असणारा कामाचा ताण फक्त एकाच ठिकाणी किंवा कंपनीमध्ये दिसून येत नाही. जर तणावाची पातळी वाढत गेली किंवा बराच काळ एखादी व्यक्ती तणावात राहिली तर याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पडताना दिसतो.

जेव्हा एखादी व्यक्ती काम करू शकतं नाही किंवा कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही त्यावेळी ती व्यक्तीला ताण येतो. जर ऑफीसच्या कामामुळे ताण येत असेल तर आजारी पडण्याची शक्य़ता असते. यासाठी ताण नक्की कोणत्या गोष्टींमुळे होतोय आणि त्यावर काय़ उपाय करू शकतो हे पाहणं गरजेचं आहे.

कामाच्या ठिकाणी ताणतणावाची लक्षणं आपण सहसा दुर्लक्ष करतो.

भावनिक लक्षणं

 • नकारात्मक भावना
 • स्वतःवर निराश होणं
 • एकटेपणा
 • आत्मविश्वास कमी होणं
 • गोंधळणं
 • कामावर लक्ष केंद्रित न होणं

रोजच्या वागणुकीत होणारे बदल

 • खाण्याची पद्धती बदलणं
 • धुम्रपान किंवा मद्यपानात वाढ होणं
 • मूड बदलणं
 • झोपेच्या पद्धतींमध्ये बदल होणं

ताण कमी करण्यासाठी काही उपाय

 • ताणावर मात करण्यासाठी आत्मविश्वास फार गरजेचा आहे. जर तुमच्यातील आत्मविश्वास वाढला तर तुम्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता.
 • कामाच्य़ा ठिकाणी असलेल्या इतर लोकांसोबत चांगले संबंध ठेवा. यामुळे तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत त्या व्यक्तींकडून पाठिंबा मिळेल.
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter