#SuicidePreventionDay- ‘या’ 9 टीप्स रोखतील आत्महत्या

10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंधन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला यांनी आत्महत्येला कशा प्रकारे प्रतिबंध केला जाऊ शकतो याच्या टीप्स सांगितल्या आहेत.

0
883
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंधन दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्या करणं टाळता येऊ शकतं याची जागरूकता लोकांमध्ये व्हावी यासाठी हे या दिनाचं उद्दीष्ट आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी जवळपास 8,00,000 लोकं आत्महत्या करतात. म्हणजे 40 सेकंदांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू होतो. 15-29 वयोगटातील व्यक्तींमध्ये आत्महत्या हे दुसरं मृत्यूचं प्रमुख कारण ठरतंय.

जाणून घ्या आत्महत्येला प्रतिबंध करण्यासाठीच्या टीप्स

  • आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधीतरी आत्महत्येचे विचार येतात. प्रत्येकजण निर्भय असतोच असं नाही. त्यामुळे तुमच्याही मनात असे विचार आले तर आयुष्याला जगण्यासाठी अजून एक संधी द्या
  • सध्यातरी आपल्याला आत्महत्येच्या शेवटा टप्पा माहिती नाहीये. आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती विविध मार्गांचा अवलंब करतात
  • जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्ये आत्महत्येसंबंधी लक्षणं आढळून आली तर त्यांच्याशी बोला, संवाद साधा शिवाय त्यांच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत आहे का याची खात्री करून घ्या.
  • एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार असल्याची जाणीव तुम्हाला असेल तर सर्वतोपरीने त्यांची मदत करा
  • अशा व्यक्तींना बाहेर जेवायला किंवा कॉफी प्यायला घेऊन जाऊ त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. अशावेळी त्यांना अधिकरतर सल्ले न देता त्यांचं म्हणणं ऐकून घ्या
  • अशा व्यक्तींची आपण कशा पद्धतीऩे मदत करू शकतो हे पाहा
  • या व्यक्तींच्या संपर्कात रहा
  • जर तुम्हाला अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असेल तर हेल्पलाईनला कॉल करा. प्रत्येक शहरात आत्महत्या प्रतिबंधासाठी हेल्पलाईन नंबर असतात
  • गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here