…तर झोपेतही कमी होईल तुमचं वजन

तज्ज्ञांच्या मते झोप हा वजन घटवण्याचा सोपा असा मार्ग आहे. योग्य वेळेत आणि पुरेशी झोप घेतल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.

woman sleeping
झोपण्याची योग्य पद्धत कोणती?
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

वजन घटवण्यासाठी तुम्ही काय काय नाही करत? स्ट्रेस, जीवनशैली अशा अनेक गोष्टी वजनवाढीला कारणीभूत असतात. वाढतं वजन ही गंभीर समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण आपलं जेवण कमी करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते झोप हा वजन घटवण्याचा सोपा असा मार्ग आहे. योग्य वेळेत आणि पुरेशी झोप घेतल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. मात्र झोपेत तुम्हाला वजन घटवायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

झोपेच्या खोलीचं तापमान थंड असावं

तुम्ही ज्या ठिकाणी झोपणार आहात, तेथील तापमान थंड राहिल याची काळजी घ्या. जर बाहेरचं तापमान थंड असेल, तर त्याला प्रतिकार करण्यासाठी तुमच्या शरीरातील तापमान वाढेल, ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज घटण्यास मदत होईल.

झोपेची वेळ निश्चित करा

जास्त कॅलरीज घटवण्यासाठी किमान ७ ते ८ तासांची झोप  मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे टीव्ही, मोबाईल यासाठी तुम्ही झोपेशी कॉम्प्रोमाईज करत असाल, तर तसं करू नका. एका विशिष्ट वेळेत नियमित झोपत जा.

झोपण्यापूर्वी प्रोटिन शेक्स प्या

झोपण्यापूर्वी प्रोटिन शेक्स प्यायल्यानं तुमच्यातील चयापचय क्रियेचा वेग वाढतो. संशोधकांच्या मते, ३० ग्रॅम प्रोटिनयुक्त आहार घेणाऱ्या व्यक्तींची चयापचय क्रिया इतरांच्या तुलनेत जास्सत वेगानं असते.

अंधारात झोपा

झोपत असलेल्या खोलीत टीव्ही, टेबल लॅम्प, डिजिटल अलार्म क्लॉक किंवा बाहेरील प्रकाश येणार नाही याची दक्षता घ्या. त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो. त्यामुळे अंधाऱ्या खोलीत झोपा. तुम्हाला शांत झोप लागेल आणि वजन घटण्यास मदत होईल.

मोबाईल बंद ठेवा

झोपताना मोबाईल बंद ठेवा. कारण मोबाईलच्या प्रकाशामुळे तुमच्या शरीरातील मेलाटोनिनच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि चयापचय क्रियेचा वेग मंदावतो.

झोपण्यापूर्वी गरम पाण्यानं अंघोळ करा

झोपण्यापूर्वी गरम पाण्यानं अंघोळ केल्यानं तुमचे स्नायू रिलॅक्स होतात आणि तुम्हाला शांत झोप लागते.

सोर्स – हेल्थी बिल्डर्झ

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter