शांत झोप हवी आहे, मग झोपण्यापूर्वी खा या गोष्टी

सर्वांनाच हल्ली शांत झोप हवी आहे. पण कशी मिळणार शांत झोप, याचं उत्तर मिळेनासं झाले आहे. पण आम्ही तुम्हाला ही समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतो. पुरेश झोप मिळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि खाऊ नयेत, याची माहिती आपण आता पाहणार आहोत.

girl sleeping
प्रातिनिधिक प्रतिमा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

झोपच पूर्ण नाही झाली यार किंवा अंथरुणात लवकर गेलो/ गेली पण झोपच येत नव्हती, अशी वाक्य हल्ली सर्रास ऐकायला मिळतात. सर्वांनाच हल्ली शांत झोप हवी आहे. पण कशी मिळणार शांत झोप, याचं उत्तर मिळेनासं झाले आहे. पण आम्ही तुम्हाला ही समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतो. पुरेश झोप मिळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि खाऊ नयेत, याची माहिती आपण आता पाहणार आहोत.

‘द गुड स्लीप गाइड’ पुस्तकाच्या लेखिका सॅमी मायरो यांनी झोप शांत हवी असल्यास कोणत्या गोष्टी खाव्यात किंवा खाऊ नये याची माहिती या पुस्तकाद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

(टीम एमएमएम)

इन्सोम्निया हा आजार प्रत्येकी तीन व्यक्तींमागे एका व्यक्तीला होतो. याचं प्रमुख कारण म्हणजे सलग आठ तास शांत न मिळणारी झोप. आपल्यापैकी अनेकांची शांत झोप लागतच नाही ही तक्रार असते.

पुरेशी झोप न मिळणं हे कारण आहेच पण, तज्ज्ञांच्या मते शांत झोप न लागण्यासाठी झोपण्यापूर्णी आपण काय खातो किंवा पिता हे देखील तितकंच कारणीभूत ठरू शकते.

‘द गुड स्लीप गाइड’ या पुस्तकाच्या लेखिका, सॅमी मायरो यांच्या माहितीनुसार, झोपण्यापूर्वी आपण जो आहार घेतो त्या पाच गोष्टींचा नक्की समावेश करावा.

केळे – या फळात मॅग्नेशियम प्रमाण सर्वाधिक आहे. सोबत केळं स्नायूंना (मसल्स) शांत करण्याचं काम करते. यामध्ये झोपेसाठी आवश्यक असणारे सेरोटोनिन आणि मेटाटोनिनचेही घटक आहेत. सिंबा स्लीपने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, एक प्रौढ व्यक्ती दिवसात केवळ ६ तास २६ मिनिटं झोप घेत असेल. तर त्याला आठवड्याला ६ तास १० मिनिटं त्याला झोप कमी मिळते.

मध – मधामध्ये ग्लुकोज म्हणजे साखर असते. मधाचं सेवन केल्यामुळे तुमचा मेंदुला ओरेक्झिन हार्मोनची क्रिया थांबवण्यास मदत मिळते. ओरेक्झिन हार्मोन आपल्याला जाग राहण्यास मदत करतं. डोक्यात येणारे चित्र-विचित्र विचारही शांत झोप न लागण्यामागील मुख्य कारण आहे. एका सर्व्हेक्षणनुसार ५३ टक्के लोकं रात्री दिवे बंद झाल्यानंतरही विचार करत असतात.

बदाम – मायरो यांच्या म्हणण्यानुसार बदामात ट्रायप्टोफान आणि मॅगनेशियम मोठ्या प्रमाणात आढळतं. यामुळे तुमचे स्नायू थोडा आराम मिळतो व हृदयाचे ठोकेदेखील एका विशिष्ट पद्धतीने मंदावतात. सततीची धावपळ, धकाधकीचे आयुष्य आणि कामाचा ताण यामुळे आपण कायम तणावात असतो. त्यामुळे काही जण झोपेत घोरतात. त्यांच्या घोरण्याने अनेकांची ब्रम्हानंदी टाळी लागत नाही आणि झोपमोड होते.

ओट्स – शरिरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यास ओट्स मदत करतं. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नैसर्गिकरित्या वाढते. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात मेलाटोनिन असतं, अशी माहिती मायरो यांनी दिली आहे.

जायफळ – जायफळात आढळणारे ट्रायमिरस्ट्रेन घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होते व शांत झोप लागते. दरम्यान, ११ टक्के ब्रिटीश नागरिकांनी शांत झोप मिळण्यासाठी आपल्या आहारात आवश्यक ते बदल केल्याची माहिती एक सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. तुम्हाला शांत, गाढ झोप हवी असल्यास आहारात बदल करणं गरजेचं आहे. आपल्या आहारात झोपेच्या आधी गरम दुधाचाही समावेश करणं उत्तम उपाय आहे.

झोपण्यापूर्वी या गोष्टी खाणं टाळा

मद्य सेवन – झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्यामुळे गाढ झोप लागत नाही. यामुळे सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला प्रसन्न वाटत नाही. त्यामुळे शक्यतो दारू पिणं टाळावे.

तिखट जेवण – तिखट जेवणामुळे ब-याचदा अपचनासाठी समस्या निर्माण होते. मसल्याऐवजी जेवणात मिरचीचा वापर होत असले तर तुम्हाला शांत झोप मिळणारच नाही. कारण मिरचीमध्ये कॅपसायसिन नावाचा घटक आहे. ज्यामुळे शरीराचं तापमान वाढवतं, शरीराचं तापमान वाढल्याने गाढ झोप लागत नाही.

जंक फूड – इंन्स्टंट फूडच्या जमान्यात लोकं हल्ली पौष्टिक खाद्यपदार्थांचं सेवन करणं टाळू लागलेत. कारण पौष्टिक पदार्थ बनवण्यास बराच वेळ जातो. त्यामुळे जीभेचे चोचले पुरवण्याच्या प्रयत्नात जंक फूड मोठ्या प्रमाणात पोटात जात आहे. अर्थात हे पदार्थ शरीरासाठी हानिकारक आहेत. झोपण्यापूर्वी जंक फूड खाल्लं शरीराला हे पदार्थ पचवण्यासाठी कठीण जाते. परिणामी शरीरात अॅसिड तयार होते. हे अॅसिड अन्ननलिकेत पसरू लागतं ज्यामुळे पोटात आणि घशात जळजळ होऊ लागतं.

कॉफी -कॅफिनचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे कॉफी. कॉफीचं सेवन केल्याच्या १० तासांनंतरही २५ टक्के आपल्या शरीरात राहाते. यामुळे झोप येत नाही

चीज – चीज/मांसाहार पदार्थांमध्ये अमिनो अॅसिडची मात्रा अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे मेंदूला सतर्क राहण्यासाठी सतत संदेश मिळत असतात. यामुळे झोप येत नाही.
बर्गर, पिझ्झा, आईस्क्रिम या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात चीज आहे. पदार्थ शक्यतो झोपण्यापूर्वी खाणे टाळावे.

मागरोंच्या म्हणण्याप्रमाणे, काही पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. पण, तिखट, चीज, पिष्ठमय पदार्थांमुळे निद्रानाश होते. त्यामुळे निद्रानाशाची समस्या निर्माण होईल असे पदार्थ खाणं टाळावे.

सोर्स- डेली मेल

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter