उचकी येण्याची कारणं आणि उपाय

उचकी कधीही येण्याची शक्यता असते. पटापट खाल्याने, तिखट किंवा जंकफूड खाल्याने, आणि अॅसिडीटीनेही उचकी लागण्याची शक्यता असते.

0
157
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कोणाला उचकी लागली की आपण लगेचंच म्हणतो कोणीतरी आठवण काढत असेल. मात्र उचकी लागण्याला वैज्ञानिकही कारण आहे. डॉक्टरांच्या मते, उचकी ही डायफ्रॅमच्या अचानकपणे आकुंचन पावल्यामुळे येते. उचकी ही एक संरक्षित प्रतिक्रिया असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

याविषयी मुंबईतील सर जे.जे रूग्णालयाचे लायप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर अमोल वाघ सांगतात की, “उचकी लागण्यासाठी विविध कारणं आहेत जसं की, फास्ट फूड किंवा जंक फूडचं सेवन, कार्बोनेटेड पेय.” उचकी न थांबणं हे पचनक्रियेसाठी घातक ठरू शकतं.

बॉम्बे रूग्णालयाचे डॉक्टर गौतम भंसाली सांगतात की, “एकाचवेळी अतिप्रमाणात खाणं, पित्ताचा त्रास किंवा खोलीच्या तापमानात अचानक बदल झाल्यास उचकी लागण्याची शक्यता असते.”

उचकी लागण्याची कारणं

  • पटापट खाणं
  • तिखट, जंक फूड किंवा फास्ट फूडचं सेवन
  • अॅसिडिटी

दीर्घकाळ उचक्यांमुळे येणारे अडथळे

  • दीर्घकाळ उचक्यांमुळे खाते वेळी अडथळा निर्माण होतो
  • दीर्घकाळ उचक्यांमुळे तुम्ही शांत झोपू शकत नाही
  • उचकी लागली असताना बोलताना त्रास होतो

दीर्घकाळ उचकी लागली असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

उचकी कशी थांबवाल?

भरपूर पाणी प्या.

-पाणी प्या आणि श्वास थोडावेळ रोखून ठेवा. श्वास रोखून धरल्याने फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढण्यास मदत होते

-डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)