कशी घ्याल हिरड्यांची काळजी?

दात स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासावेत असं डॉक्टर सांगतात. मात्र फक्त असं केल्याने दातांचं आरोग्य सुधारतं असं नाही. त्यासाठी हिरड्यांची काळजी घेणं तितकचं आवश्यक आहे.

कशी घ्याल हिरड्यांची काळजी?
सोर्स- वेल क्लिनिक
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दातांसोबतच हिरड्यांचं आरोग्यही जपणं महत्त्वाचं आहे. दातांचे आरोग्य हे हिरड्यांची मजबूती तसेच स्वच्छतेवर अवलंबून असतं. हिरड्या स्वच्छ नसतील तर त्याचा परिणाम दातांवर होतो. यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा समस्या उद्भवतात.

याविषयी शासकीय दंत रूग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. मानसिंग पवार म्हणाले की, “खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत. त्यामुळे दातांवर स्तर निर्माण होतो. या जंतुमुळे दातांना कीड लागते. याचा परिणाम हिरड्यांवर होतो. हिरड्या सुजतात, हिरड्यातून रक्त येते किंवा दात व हिरड्यांमध्ये अंतर तयार होतं. यासाठी दातांची समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार न झाल्यास हिरड्यांमध्ये पु सुद्धा होऊ शकतो.”

हिरड्यांची काळजी कशी घ्याल?

हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी कच्च्या भाज्या चावून खाव्यात.

‘सी’ जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश असावा, यामुळे हिरड्या मजबूत होतात. आवळा, संत्री तसेच मोसंबी अशी फळे खावीत.

दिवसातून दोनवेळा दात घासावेत.

तोंडाचा व्यायाम केल्याने हिरड्यांचं आरोग्य सुधारते. वरचे दात खालच्या दातांवर दाबावेत. असे केल्याने हिरड्यांतील रक्ताभिसरण वाढते आणि हिरड्यांमध्ये ताकद येते.

साखरेच्या सेवनाने बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळे साखरेचे सेवन शक्यतो कमी करावे. हे बॅक्टेरिया हिरड्यांमध्ये साचून राहतात यामुळे दात किडतात आणि दातातून रक्त येते.

काहीही खाल्यानंतर दातात अडकलेले खाद्यपदार्थांचे कण टूथपिकने काढावेत. दातांमध्ये अडकलेले हे कण कालांतरानं कूजतात. त्यामुळे हिरड्यांचं आरोग्य बिघडतं.

खाद्यपदार्थांचे कण काढताना धारदार वस्तूंचा वापर करू नये. यामुळे जखम झाल्यास सेप्टिक होण्याचा धोका असतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter