डोळे चांगले ठेवायचेत? मग हे पदार्थ खाणं गरजेचं..!

डोळ्यांचं चांगलं आरोग्य राखण्यासाठी डोळ्यांना आराम दोणं गरजेचं आहे. जर दैनंदिन आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या आरोग्याची आपण सातत्त्याने काळजी घेत असते मात्र डोळ्यांची काळजी घेण्यास आपण हलगर्जीपणा करतो. मोबाईलची स्क्रिन, टीव्ही तसंच सारख कॉम्पुटरच्या समोर राहिल्याने डोळ्यांवर परिणाम होतो. डोळ्यांचं चांगलं आरोग्य राखण्यासाठी डोळ्यांना आराम दोणं गरजेचं आहे. जर दैनंदिन आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.

Leafy-Vegetables

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅरोटीन नावाचा घटक असतो. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅरोटीन हा घटक महत्त्वाचा ठरतो. कॅरोटीनमुळे डोळ्यांची शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

जीवनसत्त्व

डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी आहारात जीवनसत्त्वांचा समावेश असमं गरजेचं आहे. य़ासाठी अ, क आणि इ हे जीनवसत्त्व असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. या पदार्थांच्या सेवनाने वाढत्या वयाचा रेटीनावर प्रभाव पडत नाही. परिणामी डोळ्यांची दृष्टी सुधारते.

akrodअक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत अक्रोडमध्ये इ जीवनसत्त्व असतं. ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य शाबूत राहतं. शिवाय यामध्ये फॅटी असिड देखील असत. यामुऴे डोळ्यांच्या पेशी मजबूत होण्यास मदत होते.

वेलची

वेलचीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. शिवाय नजर सुधारण्यास देखील मदत होते. यासाठी वेलची दूधात घालून दुधाचं सेवन करावं.

Badam

अक्रोडप्रमाणे बदामाच्या सेवनाचे भरपूर फायदे आहेत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील बदामाचं सेवन फायदेशीर ठरतं. यासाठी रात्री पाण्यात किंवा दूधात बदाम भिजवून ठेवावेत. आणि दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांचं सेवन करावं. शिवाय याचा प्रभाव स्मरणशक्तीवर देखील होतो.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter