या टीप्स तुमच्या डोळ्यांचा थकवा दूर करतील!

दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपल्याला डोळ्यांच्या समस्या जाणवू लागतात. डोळ्यांवर आलेला हा ताण कसा दूर करायचा यासाठी काही टीप्स

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

दिवसभर कॉम्प्युटरसमोर काम करताना आपल्या डोळ्यांवर ताण येतो. मात्र कामाच्या गडबडीत आपण त्याकडे दुर्लक्ष करू लागतो. डोळ्यांनी धूसर दिसू लागलं किंवा डोकं दुखू लागलं की आपण आपल्या डोळ्यांचा विचार करतो. दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपल्याला डोळ्यांच्या समस्या जाणवू लागतात. डोळ्यांवर आलेला हा ताण कसा दूर करायचा यासाठी काही टीप्स

गुलाब पाणी

कापसाचा बोळा गुलाबपाण्यात भिजवा आणि किमान 10 मिनिटं डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो. डोळ्यांची सूज कमी होते, थकवा दूर होतो.

मसाज

डोळे बंद करा आणि हाताच्या बोटांनी डोळ्यांना हळुवारपणे मसाज करा. यामुळे डोळ्यांमधील रक्तप्रवाहही सुधारतो. यामुळे डोळ्यांचा पफीनेसच नाही, तर ताण आणि थकवाही दूर होतो. याशिवाय डोळे पाणीदार राहतात, कोरडे पडत नाहीत.

थंडावा

एका स्वच्छ कापडात बर्फ बांधा आणि डोळ्यांवर 4 मिनिटं ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो, शिवाय ताजंतवानंही वाटतं.

डोळ्यांवर हात ठेवा

दोन्ही तळहात एकमेकांवर घासा आणि त्यानंतर डोळे बंद करून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना उबदारपणा मिळेल. यानंतर डोळे उघडा आणि आजूबाजूला पाहा. ही प्रक्रिया तुम्ही दिवसभरात कधीही आणि कुठेही करू शकता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter