सोपे उपाय करा..अवेळी खाण्याची इच्छा टाळा

अनेकवेळा आपल्याला खाण्याची तीव्र इच्छा होते. काहीही केल्या ही इच्छा आपण रोखू शकत नाही. अशावेळी ही इच्छा टाळण्यासाठी या टीप्स फॉलो करा.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्याला अनेकदा भूक लागते. काहीवेळा तर कितीही वाजता भूक लागते. काहीही केल्या आपण स्वतःला रोखू शकत नाही. अशावेळी आपल्याला खाण्याची तीव्र इच्छा होते परिणामी आपण रात्री-अपरात्री देखील उठून खातो. यामुळे अॅसिडीटीसारखे त्रास बळावतात. अशी खाण्याची तीव्र इच्छा टाळता येऊ शकते का? तर हो…ही इच्छा टाळण्यासाठी या टीप्स फॉलो करा

मन दुसरीकडे वळवा

जर तुम्हाला अशी केव्हाही खायची इच्छा झाली तर दुसऱ्या गोष्टीत तुमचं मन गुंतवा. शिवाय यावर उपाय म्हणून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींशी बोला. त्यांना मेसेज करा. तसंच तुमचं आवडतं पुस्तक वाचायला घ्या. यामुळे तुम्ही खाण्याच्या इच्छेपासून दूर रहाल.

पाणी प्या

जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा खरंतर तुम्हाला तहान लागलेली असते. त्यामुळे तुम्हाला भूक लागली की एक संपूर्ण ग्लासभर पाणी प्या. त्यामुळे कदाचित तुमची भूक निघून जाईल.

पुरेशी झोप घ्या

शरीराला हवी तेवढी झोप मिळाली नाही तर त्याचा परिणाम हा भूकेवर होतो. यामुळे अचानक खाण्याची तीव्र होते. जेव्हा तुम्ही शरीराला पुरेसा आराम देत नाही त्यावेळी त्याचा परिणाम हार्मोन्सवर होतो आणि यामुळे तुमची भूक वाढते.

नियमितपणे खा

खाण्याचं वेळापत्रक आखलं पाहिजे आणि त्या वेळापत्रकानुसार खाल्लं पाहिजे. किंवा जर तुम्हाला नियमितपणे खाण्यास वेळ नसेल तर तुमच्यासोबत स्नॅक्स ठेवत जा.

भूक लागली असताना खाद्यपदार्थ विकत घेऊ नका

अनेकजणं भूक लागली की दुकानातून पटकन काहीतरी खायला आणतात, मात्र असं कधीही करू नये. कारण जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही बरेच खाण्याचे पदार्थ विकत घेता.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter