महिलांसाठी- मासिक पाळीदरम्यान कशी स्वच्छता बाळगाल?

स्त्रियांच्या स्वच्छतेचा परिणाम हा त्यांच्या आरोग्यावर होतो. मसिक पाळी दरम्यान महिलांनी स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असतं. महिलांनी ही काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिलीये.

0
85
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मासिक पाळीदरम्यान योग्य ती स्वच्छता राखण्यासाठी अनेक महिला सॅनिटरी नॅपकीन्स आणि टॅम्पॉनचा वापर करतात. जेव्हा आपण मासिक पाळीच्या स्वच्छतेसंदर्भात बोलतो त्यावेळी इन्फेक्शन, दुर्गंधी, जळजळ किंवा खाज इत्यादी गोष्टींचा टाळण्याचा प्रयत्न करतो.

महिलांच्या स्वच्छतेसंदर्भात सांगताना वाशीच्या हिरानंदानी रूग्णालयाच्या कंसल्टंट गायनॅकोलॉजस्ट डॉ. मंजिरी मेहता म्हणाल्या की, “मासिक पाळी दरम्यान महिलांना वापरण्यासाठी अनेक गोष्टी आजकाल बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या गोष्टी योग्यरित्या कश्या वापराव्यात याची माहिती असणं गरजेचं आहे.”

मुंबईतील गायनेकोलॉजीस्ट डॉ. उदय राणे म्हणाले की, “महिलांनी योनीमार्ग स्वच्छ ठेवणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे ही गोष्ट प्रत्येक महिलेने जाणीवपूर्वक केली पाहिजे. शिवाय मासिक पाळी दरम्यान सुगंधित सॅनिटरी नॅपकीन वापरणं टाळावं. डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्फेक्शन होणार नाही अशी पावडर आणि लोशन महिलांनी वापरावं.”

डॉ. मेहता पुढे म्हणाल्या की, “मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड्स नियमितपमे बदलले गेले पाहिजेत. २-३ तासांनी महिलांनी सॅनिटरी नॅपकिन्स बदलावे. यामुळे इन्फेक्शन आणि पुरळ सारख्या समस्या उद्भवणार नाहीत. जर तुमची त्वचा नाजूक असले तर सॅनिटरी पॅडचा वापर कऱण्याअगोदर त्वचा योग्यरित्या धुवून घ्यावी.”

ब्रीच कँडी रूग्णालयाच्या काऊंसिलिंग गायनेकोलॉजीस्ट डॉ. निता वर्टी म्हणाल्या की, “सध्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिलं जातं. यामुळे आजकाल महिला सॅनिटरी नॅपकीन्सबाबत योग्य ती दक्षता घेताना पाहायला मिळतात.”

सॅनिटरी नॅपकीन्सला दुसरा पर्याय म्हणजे टॅम्पॉन. खेळाडू आणि स्विमर सामान्यपणे टॅम्पॉनचा वापर करताना पाहायला मिळतात. याच्या वापराने दुर्गंध येत नाही शिवाय टॅम्पॉन सहरित्या बाळगू शकतो.

डॉ. मेहता यांच्या सांगण्यानुसार, टॅम्पॉन काही काळाने बदलणे आवश्यक असतं.

  • रात्री झोपताना टॅम्पानचा वापर करू नये. असावेळी सॅनिटरी नॅपकीन्स वापरणं फायदेशीर ठरतं
  • स्किन इन्फेक्शन असताना टॅम्पॉनचा वापर करू नये.
  • मासिक पाळी सुरु नसल्यास टॅम्पॉनचा वापर करू नये
  • रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असल्यास टॅम्पॉनचा वापर टाळावा

डॉ. मेहता पुढे म्हणाल्या की, “मेंस्टुअल कपबाबत बोलायचं झालं तर याचा वापर देखील अंतर्भागात करावा लागतो. मेंस्ट्रुअल कपचा वापर केल्याने खेळ किंवा इतर गोष्टी सहजरित्या करू शकतात. मात्र जर महिलांना केमिकलची अॅलर्जी असेल तर मेंस्ट्रुअल कप वापरणं टाळावं.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)