‘या’ गोष्टीमुळे तुमचं वजन वाढू शकतं

दिवसभरात सहा तास बसण्यापेक्षा उभं राहिल्याने वजन वाढण्याचा धोका कमी होतो. इतकचं नाही शिवाय अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते. असं एका संशोधनाच्या माध्यमातून स्पष्ट झालंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

बस किंवा ट्रेनमध्ये बसायला जागा नसली की उभं राहणं आपल्या जीवावर येतं. शक्यतो आपण कोणत्याही ठिकाणी उभं राहणं पसंत करत नाही. मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार असं लक्षात आलंय की, दिवसभरात सहा तास बसण्यापेक्षा उभं राहिल्याने वजन वाढण्याचा धोका कमी होतो. इतकचं नाही शिवाय अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते.

यासाठी संशोधकानी जवळपास १,१८४ जणांवर अभ्यास केला. ३३ वयोगटातील व्यक्तींचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. यामध्ये ६० टक्के पुरुषांचा समावेश होता.

या संशोधनाच्या वरिष्ट अभ्यासक प्राध्यापक फ्रान्सिस्को लोपेझ यांच्या सांगण्यानुसार, उभं राहिल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. शिवाय शारीरिक हालचालीमुळे स्नायू तंदुरूस्त राहून हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. त्यामुळे उभं राहिण्याचे फक्त वजन कमी न होता इतरही फायदे आहेत.

या संशोधनातून असं स्पष्ट झालं की, जेव्हा व्यक्ती उभी राहते त्यावेळी एका जागी स्थिर न राहता त्या व्यक्तीची थोडीफार शारीरिक हालचाल होते. त्यामुळे कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे बसण्यापेक्षा उभं राहणं फायदेशीर ठरतं.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, आमच्या संशोधनातून असं स्पष्ट झालंय की वजन कमी करण्यासाठी एका जागी बसून राहण्यापेक्षा उभं राहणं फायदेशीर असतं.

प्राध्यापक लोपेझ पुढे म्हणाले की, व्यक्तींनी शक्यतो अधिक तास बसणं टाळावं. उभं राहिल्याने एका प्रकारची शारीरिक हालचाल होते. जी शारीरिक आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते.

हे संशोधन युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेटींग कार्डियोलॉजीमध्ये प्रसिद्ध कऱण्यात आलंय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter