#SuicidePreventionDay- आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही…

डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मनात अनेक विचित्र विचार सुुरु असतात. त्यातील एक विचार म्हणजे आत्महत्या. मात्र आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही. त्यामुळे अशा व्यक्तींशी कसं बोललं आणि वागलं पाहिजे याची माहिती दिलीये मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रितम चांडक यांनी.

0
1023
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मनात अनेक विचित्र विचार सुुरु असतात. यामुळे त्यांच्या समोर असलेल्या समस्यांना देखील ती व्यक्ती उपाय शोधू शकत नाही. शिवाय जवळच्या व्यक्तीशी बोलूही शकत नाही. मात्र आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसून अशा व्यक्तींशी बोलल्यास किंवा त्यांना समजून घेतल्यास त्यांनी या समस्येतून बाहेर काढणं अवघड नाही.

अशावेळी या व्यक्ती त्रासातून मुक्त होण्यासाठी आत्महत्या करण्याचा विचार करतात. मात्रा अशा व्यक्तींनी एका लक्षात ठेवावं की, डिप्रेेशनचा तुम्हाला कितीही त्रास होत असेल किंवा दुःख कधीच संपणार नाही अशी जरी भावना मनात येत असेस तरीही हे दुःख काही काळापुरतचं असतं. या समस्येवर उपाय शोधले जाऊ शकतात. या उपायांमुळे नक्कीच तुमच्यात सकारात्मक बदल दिसून येतात.

दरवर्षी जवळपास आठ लाख लोकं दरवर्षी डिप्रेशनमुळे आत्महत्या करतात. यामध्ये भारताची आकडेवारी ही 17 टक्के आहे. भारतात पुरुष आणि महिलांच्या आत्महत्येचा रेशो हा 2:1 आहे. त्यानुसार दर दिवशी देशात 300 जणं आत्महत्या करतात.

आत्महत्येचे विचार आणणारी लक्षणं

  • आपण इतरांवर ओझं बनण्याची भावना
  • अचानक भिती वाटणं
  • जगण्याला कोणतंही कारण नाही असं वाटणं
  • स्वतःला मारण्याचा प्रयत्न करणं

वागणूकीत होणारे बदल

  • मद्यपान आणि दारूचं अतिप्रमाणात सेवन करणं
  • स्वतःला मारण्यासाठी मार्ग शोधणं
  • ऑनलाईन आत्महत्या करण्याचे मार्ग शोधणं
  • कशातही मन न लागणं
  • मित्र आणि परिवारापासून दुरावणं
  • दीर्घकाळ झोपणं

आत्महत्येसंबंधी असलेला गैरसमज म्हणजे, ‘लोकं आत्मत्येबाबत बोलताता मात्र सहसा करत नाहीत’.

मुळात आत्महत्या किंवा त्यासंबंधीचे विचार हे नेहमी गांभीर्याने घतले पाहिजेत. अनेकदा व्यक्ती आत्महत्या करण्याच्या निर्णयामध्ये गंभीर असतात.

एखाद्या व्यक्तीच्या मनात अशा भावना येत असतील तर त्याला मदत करा

त्या व्यक्तीशी बोला

यापूर्वी केलेल्या अभ्यासांच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की, जर आपण त्या व्यक्तीला त्याच्या समस्यांंसंदर्भात विचारलं किंवा त्यांच्याशी याविषयी बोललं तर त्यांच्या मनातील विचार कमी होण्यास मदत होते.

त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या

स्वतःला इजा पोहोचवून घेतील अशा गोष्टींपासून त्यांना दूर ठेवा.

शक्यतो त्यांच्या सोबत रहा

त्या व्यक्ती काय विचार करतात तसंच त्यांची वागणूक याकजे काळजीपूर्वक लक्ष द्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter