श्रीनगर- महाराजा हरी सिंह रुग्णालयात दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद

मंगळवारी दुपारी श्रीनगरच्या महाराजा हरी सिंह रुग्णालयात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक शिपाई शहीद झाला, तर दुसरा गंभीर जखमी झालाय. दहशतवाद्यांना मेडिकल तपासणीसाठी रुग्णालयात आणलं असता हा हल्ला झाला. या घटनेत अटकेत असलेला एक पाकिस्तानी दहशतवादी फरार झाल्याची माहिती मिळतेय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter
  • श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला
  • महाराजा हरी सिंह रुग्णालय टार्गेट
  • दहशतवाद्यांनी केला रुग्णालयात गोळीबार
  • एक पोलीस शिपाई शहीद, दुसरा जखमी
  • पाकिस्तानी दहशतवादी फरार

smhs

श्रीनगरच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराज हरी सिंह रुग्णालयात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. रुग्णालयाच्या आत झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस आणि लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा दिलाय.

मिळालेल्या माहितीनुसार,

  • पोलीस दहशतवाद्यांना घेऊन आरोग्य तपासणीसाठी आले होते
  • दहशतवाद्यांनी रुग्णालयात पोलिसांवर फायरिंग केली
  • सेंट्रल जेलमधून दहशतवाद्यांना आणलं होतं
  • पोलिसांवर पाठीमागून हल्ला करण्यात आला
  • एक पोलीस शिपाई शहीद, दुसरा गंभीर जखमी

श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक इम्तियाज इस्माईल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “सहा दहशतवाद्यांना आरोग्य तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. त्यापैकी एकाने पोलिसांची बंदूक खेचून फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती आहे. यात नावेद नावीचा दहशतवादी फरार झालाय.”

पोलीस आणि लष्कराने नावीदला शोधण्यासाठी एक वेिशेष मोहीम सुरू केलीये. नावीदला, काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter