ई-सिगारेटच्या वेपिंगचा शरीरावर काय परिणाम होतो?

सिगारेटवर पर्याय म्हणून लोक इलेक्ट्रॉनिक सिगारेटकडे वळतात. मात्र या ई-सिगारेटचा देखील शरीरावर परिणाम होतो. ई-सिगारेटच्या वेपिंगमुळे शरीरावर काय परिणाम होतात याची माहिती दिली आहे, मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयाचे कंसल्टंट पल्मोनोलॉजीस्ट डॉ. प्रेयास वैद्य यांनी.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

१० पैकी सुमारे ७ धूम्रपान करणारे लोक म्हणतात की त्यांना धूम्रपान बंद करायचे आहे. पण असं करणं त्यांना फार कठीण वाटतं. अनेकदा, पारंपरिक सिगारेटला पर्याय म्हणून लोक इलेक्ट्रॉनिक सिगारेटकडे वळतात. ई-सिगारेट्स ही बॅटरीवर चालणारी धूम्रपानाची उपकरणं आहेत, ज्यात निकोटीन असूही शकतं किंवा निकोटीन नसेल. ही ई-सिगारेट्स निकोटिन, प्रॉपेलिन ग्लायकोल आणि ग्लिसरिनयुक्त द्रवपदार्थ गरम करतात आणि त्यातून वाफा येतात. त्याला व्हेपिंग असं म्हटलं जातं. ही वाफ सिगारेटपेक्षा कमी धोकादायक असते मात्र सिगारेटमधील तंबाखूप्रमाणेच त्याचा मानवी शरीरावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो.

सामान्य धूम्रपानापेक्षा ई-सिगारेट्स चांगल्या आहेत का?

सिगारेट किंवा ई-सिगारेट्स हे दोन्ही अवयवांसाठी सारखेच धोकादायक आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. सामान्य धूम्रपान आणि ई-सिगारेट्समधील एकमेव फरक म्हणजे दुसऱ्या प्रकारात तंबाखू असू किंवा नसू शकतो, मात्र तंबाखूसारखी इतर अनेक रसायनं तुमच्या शरीरात व्हेपिंगद्वारे जातात. सध्या ई-सिगारेट्स ट्रेंडिंग असताना व्हेपिंगही किशोरवयीन तरूणांमध्ये वाढताना दिसतं आहे. संशोधनातून असं समोर आलं आहे की, कूल दिसण्यासाठी किशोरवयीन मुलं सिगारेटच्या तुलनेत ई-सिगारेट्सचा वापर करतात.

 शरीरावर व्हेपिंगचा काय परिणाम होतो?

  • मेंदूचा विकास कमी होतो
  • स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि एकाग्रता कमी होते
  • मूड स्विंग्स आणि अटेंशन डेफिसिट डिसॉर्डर होऊ शकतात
  • डोकेदुखी
  • फुफ्फुसांना त्रास होणं

सतत वापरण्यात आल्यास व्हेपिंगमुळे डिहायड्रेशनचा त्रासही होतो. व्हेपिंगमुळे व्यसनाधीनता येऊ शकते आणि त्यावर नंतर उपचार करणं कठीण असतं. व्हेपिंगचे अनेक दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं कारण व्यसन जीवघेणे ठरू शकतं. व्हेपिंग सोडण्याच्या काही टिप्समध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो –

सोडण्याबाबत समाधानी राहा

धोकादायक रसायनं बंद करण्यास वेळ लागतो. मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्यासाठी आतुर व्हाल. शारीरिकदृष्टया सेवन सोडणं सोपं असतं. वेदना खूप पटकन कमी होतात. मात्र मानसिक सवयी सोडण्यास खूप वेळ लागतो.

फक्त एकच असं म्हणून उपयोग नाही

फक्त एकदा व्हेपिंग केल्यानं कठीण क्षणातून तुम्हाला पुढे जाणं सोपं होईल असा विचार करू नका. याला पर्याय म्हणजे साखरमुक्त गम चघळणे किंवा पाणी पिणं.

मन दुसरीकडे वळवा

आयुष्य लवकरच सामान्य होईल. तुम्हाला गरज वाटू लागल्यास स्केचिंग किंवा लिहिण्याचा छंद जोपासून स्वतःचे लक्ष दुसरीकडे वळवा. एखाद्या मित्राशी बोला, तुमची आवडती गाणी ऐका किंवा १० खोल श्वास घ्या- मित्रांशी बोलल्यानेही तुम्हाला खूप फायदा होईल.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter