कॉमिकचा हिरो देणार मुलांना टीबीचे धडे

शाळेतील मुलांमध्ये कार्टून्सच्या माध्यमातून टीबी संदर्भात जनजागृती करण्यात येतेय. हे काम Operation Asha ही स्वयंसेवी संस्था दोन महिन्यांपासून करतेय. महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना टीबी बाबत माहिती देण्यासाठी त्यांना गोष्टीच्या पुस्तकाचं वाटप केलं जातंय.

0
370
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

कॉमिकमधला हसवणारा सुपांडी असो, शिकार कऱणारा शिकारी शंभु असो किंवा चतुराई दाखवणारा राजा हुजा असो… केवळ लहान मुलांचं मनोरंजन हे एकच त्यातील उद्दीष्ट. मात्र या लहान मुलांच्या कॉमिक म्हणजे कार्टून्स असलेल्या गोष्टींच्या पुस्तकांद्वारे आता टीबी संदर्भात जनजागृती कऱण्यात येणारे.

मुळात टीबी हा संवेदनशील विषय असल्याने लहान मुलांना पटकन समजणार नाही. पण मुलांच्या कलेने घेऊन त्यांना टीबीपासून कसं दूर राहता येऊ शकतं याबाबत माहिती पटवून देण्यासाठी कॉमिकचा वापर करण्यात आलाय. त्यानुसार लहान मुलांना गोष्टीच्या पुस्तकातून टीबीबाबत जागरूक केलं जातंय. या मुलांमध्ये पहिल्यांदा टीबी संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी Operation Asha ही स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहे.

Ins2

‘नाइट वुल्फ’ असं या पुस्तकाचं नाव असून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांमध्ये याच वाटप करून टीबीसंदर्भात जागरूक करण्याचं काम केलं जातयं. टीबी कशामुळे होतो, लक्षणं, कोणता पौष्टीक आहार घ्यावा, औषध कशी घ्यावीत, आजार किती दिवसांत बरा होतो याबाबत कार्टून्सच्या माध्यमातून माहिती मुलांना दिली जातेय.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना Operation Asha या स्वयंसेवी संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक संजयकुमार शुक्ला म्हणाले, “टीबी हा विषय लहान मुलांना कसा समजवून सांगायचा हा प्रश्न होता. मुलांना कार्टून खूप आवडतात. ही मुलं कार्टुनमध्ये दाखवलेल्या गोष्टीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे ‘कार्टून हिरो’ टीबीवर कसा मात करतो हे या गोष्टीतून मुलांना पटवून सांगण्याचं आम्ही ठरवलं. त्यानुसार आता दोन महिन्यांपासून शाळेतील मुलांमध्ये या पुस्तकाचं वाटप करून त्यांना माहिती दिली जातेय.’’

Ins (1)

“२००५ सालापासून आमची स्वयंसेवी संस्था टीबी या आजारासंदर्भात अविरतपणे काम करतेय. विविध वयोगटातील व्यक्तींमध्ये आम्ही टीबीसंदर्भात जनजागृती निर्माण करतोय. यासाठी ६० व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. भारतातून टीबी मुक्त करण्याचं सरकारचं ध्येय आहे. सरकारच्या या प्रयत्नात आम्ही सहकार्य करतोय. या संस्थेचे कार्यकर्ते दररोज घरोघरी जाऊन टीबीचे रुग्ण शोधून काढून त्यांना आवश्यकतेनुसार उपचारांची सुविधा उपलब्ध करून देतायेत. मात्र एवढ्यावरच भागणार नसल्यानं आता शाळेतील लहान मुलांमध्ये टीबीबाबत माहिती देण्याचा आम्ही निर्णय घेतलायं,’’ असंही शुक्ला यांनी सांगितलं.

या संस्थेचे वसईतील प्रोग्राम ऑफिसर दिपक शर्मा म्हणाले, “मागील २० दिवसांपासून आम्ही ही मोहीम सुरू केलीये. त्यानुसार हिंदी आणि मराठी भाषेतील हे गोष्टीचं पुस्तक मुलांना वाटली जातायत. आतापर्यंत वसईतील पाच शाळांमधील मुलांना या पुस्तकाचं वाटप करण्यात आलंय. मुलं आणि शिक्षकांचा याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मुळात या माध्यमातून मुलं घरी जाऊन स्वतः टीबीबाबत आई-वडिलांना माहिती देतात. त्यानुसार आतापर्यंत दोन टीबीची मुलं सापडली आहेत.”

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter