होमिओपॅथी औषधं घेताय मग ‘हे’ नक्की वाचा

होमिओपॅथी औषधांचा वापर संपूर्ण जगभरात वाढलाय. संपूर्ण जगभरातील जवळपास 85 देशात या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, होमिओपॅथीची औषधं घेताना पथ्य पाळणं गरजेचं असतं.

0
8456
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. होमिओपॅथी ही अत्यंत लोकप्रिय उपचारपद्धती म्हणून ओळखली जाते. जर जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, अॅलोपॅथीनंतर होमिओपॅथीचा वापरही जगात सर्व ठिकाणी केला जातोय. तर डब्लूएचओच्या अहवालानुसार, संपूर्ण जगभरातील जवळपास 85 देशात या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, होमिओपॅथीची औषधं घेताना पथ्य पाळणं गरजेचं असतं.

होमिओपॅथीची औषधं घेताना कोणती काळजी घ्याल?

  • होमिओपॅथीची औषधं बंद ठेवावीत
  • ही औषधं शक्यतो थंड जागेत ठेवावीत
  • औषधं घेतल्यानंतर लगेच बाटलीला झाकण लावावं
  • आपला औषधाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी
  • बाटलीच्या झाकणाच्या मदतीने औषध घ्या

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना होमिओपॅथी फेडरेशनचे डॉ. प्रशांत राणे म्हणाले की, “होमिओपॅथीच्या औषधांचा वापर सध्या बऱ्यात प्रमाणात केला जातो. मात्र ही औषधं घेताना रूग्णाने योग्य ती पथ्यही पाळणं गरजेचं आहे. होमिओपॅथीची जी औषधं द्रव स्वरूपात असतात ती ड्रॉपर घ्यावीत. शिवाय होमिओपॅथीच्या गोळ्यांमध्ये द्रव पदार्थ असतो त्यामुळे त्याला स्पर्श करायचा नाही. जर या औषधांना स्पर्श झाला तर त्याचा प्रभाव कमी होतो.”

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, होमिओपॅथीची औषधं घेणाऱ्या रूग्णांना आहारात देखील काही पथ्य पाळावी लागतात

  • तीव्र गंध असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करू नये
  • लसूण, आलं, कॉफी यांचं सेवन टाळावं
  • होमिओपॅथी औषधं घेण्याच्या अर्धा तास आधी आणि नंतर खाणं किंवा पिणं टाळा
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter