स्वाईन फ्लूपासून स्वत:ला कसं ठेवाल सुरक्षित?

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूमुळे १९१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १,७७२ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. अशी माहिती राज्य सरकारने दिली. त्यामुळे स्वाईन फ्लूची लक्षणं ओळखणं आणि उशीर होण्याआधीच प्रतिबंध करणं गरजेचं आहे. स्वाईन फ्लूची लक्षणं, उपचार आणि प्रतिबंध याबाबत मुलुंड आणि कल्याण फोर्टिस रुग्णालयातील संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. किर्ती सबनीस यांनी मार्गदर्शन केलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

स्वाईन फ्लू म्हणजेच H1N1 हा संसर्गजन्य आजारा आहे. H1N1 व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या अगदी कमी संपर्कात आल्यासही हा आजार होऊ शकतो. जेव्हा स्वाईन फ्लू झालेला रुग्ण खोकला, थुंकला किंवा शिंकला तर त्या थेंबामुळे हा व्हायरस हवेत पसरतो. स्वाईन फ्लू रुग्णाच्या थुंकीचे थेंब लिफ्टचं बटण, बाथरूममधील फ्लशचं बटण, दरवाज्याचं हँडल यावर असतील तरी अशा जागांना स्पर्श करणाऱ्या निरोगी व्यक्तीला स्वाईन फ्लू होऊ शकतो.

त्यामुळे स्वाईन फ्लूबाबत काही सामान्य गोष्टी सर्वसामान्यांना माहित असाव्यात.

स्वाईन फ्लूचा धोका कुणाला जास्त?

 • ६ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक
 • गरोदर महिला
 • प्रत्यारोपण झालेले रुग्ण
 • डायलेसिसवर असलेले रुग्ण
 • रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषधं घेत असलेले रुग्ण
 • गंभीर असे आजार असलेले रुग्ण

स्वाईन फ्लूची लक्षणं लवकर कशी ओळखावीत?

स्वाईन फ्लूची लक्षणं साध्या फ्लूच्या लक्षणांप्रमाणेच असतात. त्यामुळे या दोघांमधील फरक समजणं खूप गरजेचं आहे.

 • ३ दिवसांपेक्षा अधिक काळ अति ताप
 • दीर्घकाळ सर्दी-खोकला
 • खोकताना रक्त पडणे
 • श्वास घेण्यात अडथळे
 • मळमळ आणि उलटी
 • नाक वाहणे
 • अशक्तपणा आणि थकवा

प्रतिबंधात्मक उपाय

 • हायड्रेट राहा, भरपूर पाणी प्या
 • गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
 • प्रवास करताना मेडिकल मास्क (N95 मास्क) वापरा
 • प्रोटिनयुक्त आहार घ्या

स्वाईन फ्लूमधून बरं होत असताना

 • दर दिवशी कमीत कमी २ ते ३ लीटर पाणी किंवा ज्युस, सूप अशा द्रव पदार्थांचं सेवन करा
 • सिमला मिरची, कोबी अशा भाज्या टाळा
 • तळलेला पदार्थ खाऊन नका
 • आहारा प्रोबायोटिक्सचा समावेश करा
 • साखरेचं प्रमाण, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी करा
 • घरगुती पदार्थांचं सेवन वाढवा

स्वाईन फ्लूवरील उपचार

स्वाईन फ्लूची लक्षणं दिसता स्वत मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेणं टाळा. तात्काळ तुमच्या परिसरातील डॉक्टरांशी किंवा संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञांना भेटा. तुम्हाला लसदेखील दिली जाते.

सिझनल फ्लूवर दिली जाणारी काही अँटिव्हायरल ड्रग्जही स्वाईन फ्लूवर दिली जातात. मात्र ही औषधं फ्लूची लक्षणं दिसताच ४८ तासांत घेतल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter