२०१७मध्ये ६१४२ ‘स्वाईन-फ्लू’ रुग्णांची नोंद

साल २०१६च्या तुलनेत २०१७मध्ये ‘स्वाईन-फ्लू’च्या प्रकरणात शेकडो पटींनी वाढ झालीये. २०१६ स्वाईन-फ्लूची फक्त ८६ प्रकरण समोर आली होती. २०१७मध्ये स्वाईन-फ्लूची प्रकरणं तब्बल ६१४२ नोंदवण्यात आलीयेत.

0
53
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

‘स्वाईन-फ्लू’ने २०१७मध्ये शहरी भागात हाहा:कार पसरवला होता. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकसारख्या महानगरांमध्ये ‘स्वाईन-फ्लू’ने अचानक डोकं वर काढलं. पाहता-पाहता रुग्णांची संख्या हजाराच्या घरात पोहोचली.

साल         स्वाईन-फ्लू रुग्ण       मृत्यू

२०१४             ११५                 —

२०१५            ८५८३                 —

२०१६             ८६                   २६

२०१७           ६१४२                  ७७७

डॉक्टरांच्या मते ‘स्वाईन-फ्लू’चा हा ट्रेन्ड दर एक वर्षाआड पहायला मिळतो. माय मेडिकल मंत्राशी बोलताना डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, “हा ट्रेन्ड सिझनल असल्याचं पाहायला मिळतं. एकदा का हा व्हायरस वातावरणात पसरला ही लोकांची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. पण रोगाला प्रतिकार करण्याची ही शक्ती फक्त नऊ-दहा महिनेच राहते. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती पुढच्या वर्षी मदत करत नाही.”

डॉ. आवटे पुढे म्हणतात, “स्वाईन-फ्लूची प्रकरणी कमी-जास्त होण्याचा ट्रेन्ड दर एक वर्षाआड दिसून येतो. गेल्या आठ-नऊ वर्षांपासून हा ट्रेन्ड पाहायला मिळतोय.”

पश्चिम महाराष्ट्रात ‘स्वाईन-फ्लू’ची प्रकरणं

पुणे (पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण) सातारा आणि सोलापूरात सर्वात जास्त म्हणजे ५४५६ स्वाईन-फ्लू रुग्णांची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रात २५८ लोकांचा स्वाईन-फ्लूमुळे मृत्यू झाला.

तर, मुंबईत ४०२० लोकांना स्वाईन-फ्लू झाला, तर ३२ लोकांचा बळी गेला.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)