जेवणानंतर ‘स्वीट डिश’ खाणं योग्य?

जेवल्यानंतर स्वीट डिश म्हणून काहीतरी गोड पदार्थ खाण्याची सर्वांना सवय असते. पण, आयुर्वेद डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे जेवणापूर्वी अर्धातास आधी गोड पदार्थ खा, त्यानंतर जेवण करा, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलाय.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

भरपेट जेवण झालं, की हात धुतल्यानंतर अनेकांना गोड खाण्याची सवय असते. स्वीट डिश म्हणा किंवा मग डेझर्ट. गोड म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच. आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे स्वीटडिश हा पाश्चिमात्य संस्कृतीतला प्रकार आरोग्यासाठी चांगला नाही. डॉक्टरांचा सल्ला आहे की, गोड पदार्थ खायचे असतील तर ते जेवणाआधी अर्धातास खावेत.

आयुर्वेद डॉक्टरांच्या मते गोड पदार्थ पचायला जड असतात. जेवणाच्या सुरूवातीलाच त्यांचं सेवन केल्याने त्यांचं पचन उत्तम होतेच, शिवाय पुढे जेवणाचं प्रमाणही प्रमाणही मर्यादीत राहतं. याउलट जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खाल्ल्यास पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी गोड पदार्थ खायचे असल्यास ते जेवणाच्या सुरूवातीला किंवा किमान जेवताना मध्ये खावेत.

यासंदर्भात बोलताना सायनच्या आयुर्वेद महाविद्यालयातील मानद प्राध्यापक (कायचिकित्सा विभाग) डॉ. नितीन कामत यांनी सांगितलं की, “प्रत्येक व्यक्तीसाठी सकस आहार महत्त्वाचा असतो. काय खावं, काय खाऊ नये, किती प्रमाणात खावं, जेवताना कसं बसावं इतकंच नाहीतर आहार कधी घ्यावा कधी कमी खावं याची सुद्धा आयुर्वेदात माहिती देण्यात आली आहे. कारण आहार घेताना तो व्यवस्थितरित्या पचला पाहिजे.”

अग्नी ही आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे. आपल्या अन्नाचं पचन करण्याचं काम शरीरातील अग्नी करतो. कारण सूर्य व शरीरातील अग्नीचा यांचा थेट संबंध असतो. त्यामुळे शरीरातील अग्नी सायंकाळी सुर्योद्यानंतर मंद होतो म्हणून हलका आहार करावा. खूप उशिरा जेवू नये त्यामुळे अन्न पचण्यास अवघड होतं. अन्नाचं पचन व्यवस्थित न झाल्यास पोटाचे विकार सुरू होतात.

इतकंच नाहीतर लग्नामध्ये, पाटर्यांमुळे, संमेलनांमध्ये जेवल्याच्या नंतर स्वीडडिश खायला दिले जाते. यात गुलाबजाम, जिलेबी किंवा रबडी यांसारखे पदार्थ ठेवले जातात. गोड पदार्थ पचण्यास जड असल्याने पोटासंबंधित विकार होऊ शकतात. पण अनेकांना याबाबत माहितीचं नसतं. त्यामुळे जेवणापूर्वी गोड पदार्थ खावेत किंवा जेवत करताना मध्येच गोड पदार्थांचे सेवन करावेत. जेणेकरून अन्न चांगल्या प्रकारे पचन होते, असेही डॉ. कामत यांनी सांगितलं.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

आपल्या प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here