‘हे’ पदार्थ खुलवतील नखांचं सौंदर्य, फ्रेंच मॅनिक्युअरचीही नाही गरज

फ्रेंच मॅनिक्युअर करून नखांचं सौंदर्य फक्त बाहेरून वाढवण्यापेक्षा योग्य आहार घेऊन नखांना आतून सौंदर्य द्या.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

नखं सुंदर दिसावीत म्हणून तुम्ही फ्रेंच मॅनिक्युअर करून घेत असाल. यामुळे तुमची नखं आणखी सुंदर दिसतात. मात्र नखं फक्त बाहेरून नाही तर आतूनदेखील सुंदर राहायला हवीत. म्हणजेच नखांचं आरोग्य चांगलं राहायला हवं आणि त्यासाठी आहार महत्त्वाचा आहे. तुमच्या नखांचं सौंदर्य आतून खुलवणारे पदार्थ कोणते आहेत ते पाहुयात.

दूध

milk-1711099_960_720

दूध जसं हाड आणि दातांसाठी फायदेशीर आहे  तसंच ते नखांसाठी देखील आहे. दुधातील कॅल्शिअममुळे नखं कडक होतात.

केळं

केळी खाण्याचे हे फायदे, जाणून घ्या

केळ्यातील व्हिटॅमिन बी-६, झिंक नखांना चकाकी देतं आणि नखं सुंदर दिसतात

गाजर

Harvesting bunch of fresh washed carrot on the old wooden background
Harvesting bunch of fresh washed carrot on the old wooden background

गाजरातील व्हिटॅमिन ए नखांना चकाकी देण्यासाठी आणि हाडांना मजबुती देण्यासाठी फायदेशीर आहे.

अंडं

egg

अंड्यात प्रोटिन भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे नखांना मजबुती आणि संरक्षण मिळतं.

टोमॅटो

tomato-1235662_960_720

टोमॅटोतील लिकोपिन घटकामुळे नखांना चकाकी आणि मजबुती मिळते.

ब्रोकोली

brocoli

ब्रोकोलीमध्ये आयर्न असतं, जे ऑक्सिजन सर्क्युलेशनसाठी फायदेशीर आहे. ब्रोकोलीच्या सेवनानं नखं रंगहिन होत नाहीत आणि मजबूत राहतात.

रताळे

sweet potato

रताळ्यातील बिटा केरोटिन नखांना निरोगी बनवते, नखांना चकाकी मिळते.

पाणी

सोर्स- iDiva
सोर्स- iDiva

पाण्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे नखं कमजोर होणं, पिवळी पडणं, निस्तेज होणं अशी समस्या निर्माण होत नाही. नखं कोरडी पडत नाहीत.

सोर्स – हेल्थ डायझेट

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter