सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!

सनस्क्रीनचा वापर आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचा तीव्र उन्हामुळे खराब होवू नये यासाठी करतो. पण नव्या संशोधनानुसार सनस्क्रीनच्या सतत वापरामुळे शरीरातील ‘ड’ जीवनसत्व कमी होण्याची शक्यता आहे.

सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!
सोर्स-न्यूटरली सॅव्ही, गूगल
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा अंगाची लाहीलाही करतात. तीव्र उन्हाच्या सतत संपर्कात आल्यास त्वचा काळी पडते (टॅन होते) किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर परिणाम होवू नये म्हणून आपण सनस्क्रीनचा वापर करतो.  पण सनस्क्रीनच्या अतिरिक्त वापरामुळे शरीरातील ‘ड’ जीवसत्वाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.

व्हीटॅमिन ‘डी’ म्हणजेच ‘ड’ जीवनसत्व आपल्या हाडांसाठी महत्त्वाचं आहे, ‘ड’ जीवनसत्व कॅल्शियम शोषून घेण्याचं काम करतं. ‘ड’ जीवनसत्वामुळे शरीरातील स्नायूंना आणि नसांना मदत मिळते, याचसोबत ‘ड’ जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहण्यास मदत होते.

सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!
सोर्स-गूगल

कॅलिफोर्नियाच्या टॉरो युनिवर्सिटीमध्ये यांसदर्भातील संशोधन करण्यात आलं.

यावर संशोधन करणारे डॉ किम फोटेनहॉओर यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा उन्हाळ्यात लोकं बाहेर पडतात विशेषत: महिला या सनस्क्रीनचा जास्त वापर करतात. सनस्क्रीनच्या वापराने आपल्या शरीरात तयार होणाऱ्या ‘ड’ जीवनसत्वाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. उन्हामुळे आपल्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्व वाढण्यास मदत होते. यामुळे स्नायू बळकट होतात आणि हाडे मोडण्याचा धोका संभवत नाही, म्हणून कोवळ्या उन्हात जाताना शक्यतो सनस्क्रीनचा वापर टाळावा. जेणेकरून शरीरात शरीरात ‘ड’ जीवनसत्व निर्माण होण्यास मदत होईल.

या संशोधनानुसार सनस्क्रीनचा वापर आणि मधुमेहासारखे आजार, शरीराला गरजेची असलेली पोषक द्रव्य अन्नातून शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. यामुळे संशोधनानुसार दहा लक्ष लोकांच्या शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता आढळून आली आहे.

शरीरामध्ये ड-३ जीवनसत्वाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारच्या वेळेत उन्हात फिरले पाहिजे. खासकरून एसपीएफयुक्त सनस्क्रीनचा वापर टाळावा. यामध्ये ड जीवनसत्व नष्ट करण्याची क्षमता ९९ टक्के असते.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter