उन्हाळ्यात मेकअप टिकवण्यासाठी सोप्या 5 टीप्स

उन्हाळ्यात फ्रेश दिसण्यासाठी केलेले प्रयत्न व्यर्थच ठरतात. कारण घामाने मेकअप ओघळतो. पण ह्या टीप्स वापरल्यास, मेकअप टिकवून ठेवणं सोपं होईल.

सोर्स- flicker
Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

मॉश्चरायजरचा वापर

सोर्स- the health digest

उन्हाळ्यात मॉश्चरायजरचा काय उपयोग असं, तुम्हाला वाटू शकतं. पण तेलकटपणाला दुर ठेवण्यासाठी त्वचेत ओलावा असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्वचा कोरडी राहणार नाही याची काळजी घ्या.

फाउंडेशन नको

सोर्स- Pixabay

मेकअपसाठी बेस म्हणून रेग्यूलर फाउंडेशन वापरण्याऐवजी टींटेड मॉश्चरायजर म्हणजेच, काही प्रमाणात फाउंडेशनचे गुणधर्म असलेलं मॉश्चरायजर वापरा. जवळचं फाउंडेशन वाया जाऊ नये असं वाटत असेल तर फाउंडेशन आणि मॉश्चरायजर मिक्स करुनही लावू शकता.

ब्लॉटिंग पेपर वापरा

सोर्स- Pixabay

त्वचेवरचा तेलकटपणा घालवण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडरचे थर चढवण्यापेक्षा ब्लॉटिंग पेपरचा वापर करा. यानं चेहऱ्यावरचा तेलकटपणा अलगद टिपून घ्या.

स्प्रे वापरा

सोर्स- FashionLady

चेहऱ्यावर अलगद तुषार उडवल्यास मेकअप ताजा राहण्यास मदत होते. यासाठी बाजारात काकडी, गुलाब जल, लॅवेंडर मीस्ट उपलब्ध आहेत. त्याचा वापर करावा.

पावडरचा वापर टाळा

मेकअप सेट करण्यासाठी पावडरचा वापर न करता स्प्रेचा वापर करा. यामुळे मेकअप बऱ्याच काळासाठी लॉक होईल.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter