उन्हाळ्यातील आहार कसा असावा?

उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रमुख आहारतज्ज्ञ डॉ. उषा सिसोदिया यांनी मार्गदर्शन केलं आहे.

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter

उन्हाळा सुरू होताच आपल्याला आईस्क्रिम, शेक, डिजर्ट आणि विशेष म्हणजे फळांचा राजा आंबा खाण्याची इच्छा होते. मात्र उन्हाळ्यात आपण काय खायला हवं, याची योग्य निवड करायला हवी. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे आपण आपल्या शरीरासाठी योग्य असे पदार्थ खात आहोत याची दक्षता बाळगायला हवी, चवीनं खाऊ नये.

समजा, तुम्हाला मलावरोधाची समस्या असे तर कोल्ड कॉफी, कोल्ड ड्रिंक्स आणि बिस्कीटच अशा पदार्थांचं सेवन टाळावं नाहीतर या पदार्थांमुळे समस्या जास्त बळावेल. तसंच मलावरोध टाळायचा असेल तर विरोधी आहार घेऊ नये. बटाटा आणि चणा डाळ एकत्रितपणे शरीराला गरम पडू शकतात, तर सालीसकट उकडलेला बटाटा आतड्यांच्या कार्यासाठी खूप चांगला आहे. कैरी, पुदिना, आल्याची चटणी चवीला आणि पोटासाठीही चांगली असते.

खाद्यपदार्थ कसे बनवले गेलेत याचाही शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. पनीर किंवा खोबरं घालून फ्राय केलेल्या भाज्यांऐवजी, ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेल्या आणि वाफवलेल्या भाज्या खाव्यात. समजा तुम्हाला समोसा आवडत असेल तर डिप फ्राय केलेल्या समोश्यापेक्षा बेक समोसा खाण्यास प्राध्यान द्या. सोबत दही किंवा चिंचेची चटणी घ्या. त्याच्या जोडीला फळंही खा, ज्यामुळे तुम्हाला ताजंतवानं वाटेल आणि तुमच्या जिभेलाही समाधान मिळेल.

पदार्थांचे गुणधर्म पदार्थ कसे बनवले जातात त्यानुसार बदलतात. उदा. गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती स्टफ पराठ्यापेक्षा पचण्यास हलकी असते.

उन्हाळ्यात काय खाऊ नये

  • उन्हाळ्यात तळलेले, मैद्याचे पदार्थ
  • भरपूर तूप आणि साखर घातलेली मिठाई
  • मिठाई बनवताना त्यात ड्राय फ्रूट्स घालणं टाळा
  • केक आणि इतर बेकरी उत्पादनं
  • कार्बन डायॉक्साईयुक्त पेय
  • मांसाहार आम्लयुक्त असतं त्यामुळे असे पदार्थ. या पदार्थांच्या सेवनानं होणारी असिडीटी टाळण्यासाठी सोबत क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करा

उन्हाळ्यात काय खावं

  • मिक्स ग्रीन सलाड, लेट्युससारखे हायड्रेटिंग पदार्थ ज्यात 94 टक्के पाणी असतं ज्यामुळे ते पचण्यास हलकं असतं असे पदार्थ खाल्ल्यानं कमी कॅलरीजमध्ये तुमची भूक भागते आणि वजनदेखील कमी होतं.
  • कलिंगड, स्ट्रॉबेरीज, अननस आणि बेरीज यात 92 टक्के पाणी असतं
  • संत्री, रास्पबेरीज, सेलेरी, हिरवी सिमला मिरची, काकडी यात पाणी तर असतं शिवाय व्हिटॅमिन सी आणि कॅफीक अॅसिड असतं, हे दोन्ही घटक त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतं.
  • भाज्या आणि डाळींपासून बनवलेलं सूपही तुम्ही पिऊ शकता.

 

Share onShare on FacebookShare on Google+Tweet about this on Twitter